क्राईम बॉर्डर,परिवारातर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते- व.पो.नि.संजू जॉन

जनदूत टिम    29-Jun-2020
Total Views |
डोंबिवली : संपूर्ण जगच आज कोरना या महामारीच्या विळख्यात अडकले असून या विषाणूची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जगातील शास्त्रज्ञ या विषाणूवर औषध शोधत आहे. भलेही ते लवकरच मिळेलही पण संपूर्ण जगाला कळून चुकले आहे की, निसर्गापुढे मानव मोठा नाही.तरीही काही महामूर्ख लोकांना अजूनही या भयंकर अशा कोरोना आजाराचे परिणाम लक्षात येत नाही ,ते मुक्तपणे हिंडत फिरत आहेत आणि स्वतःसह आपल्या परिवाराचा व इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत.पण आज समाजात जेवढे वाईट विचार करणारे आहेत त्याचप्रमाणे चांगल्या विचाराचेही लोकं या जगात आहेत हे वेळोवेळी आपल्याला दिसत असते.आपल्या भारत देशात कोरोनाने प्रवेश केला.
 
jon _1  H x W:
 
महाराष्ट्र राज्यात ९ मार्च ते २४ जून या काळात कोरना बाधितांची संख्या दोन वरून एक लाख ४२ हजार ९०० वर गेली. जूनच्या १७ दिवसात तर ५७००० अधिक रुग्ण वाढले.या कोरोनाचा कहर वाढत असतांना सर्वात पुढे आले ते डॉक्टर्स, नर्स , वॉर्डबॉय आणि महत्वाची जबाबदारी आली ती पोलीस दलावर. आपल्या पोलीस बांधवांनी उन्हा-तानात रात्रं-दिवस रस्त्यावर उभे राहून लॉक डाऊन काळात काम केले. वेळ प्रसंगी आपल्या खिशातील पैसेही खर्च करून गरजूंना अन्नधान्य पुरवलं. आणि जनतेला समजले की, पोलीसातही माणूस असतो.एव्हढच नाहीतर याचा त्यांनी कुठेही गाजावाजा केला नाही की, प्रसिद्धी नाही . फक्त निस्वार्थ कार्य . परंतु दुर्दैवाने यात नागरिकांसह काही डॉक्टर्स , नर्स व पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांना जीवाला मुकावे लागले.
 
या सर्वांचा विचार करून क्राईम बॉर्डर परिवाराने (एनजीओ) क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील काही डॉक्टर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ,पोलीस अधिकारी ,पत्रकार,डॉक्टर ,नर्स,सफाई कामगार , सामाजिक कार्यकर्ते व , एनजीओ ,ट्रस्ट,आशा वर्कर ,वाहन चालक अशा समाजबांधवांचा सेवा योद्धा सन्मान पत्राद्वारे - *कोरोना योद्धा सन्मान पत्र* - देऊन. सन्मान करण्यात आला.क्राईम बॉर्डर परिवाराने नुकताच ठाणे क्राईम ब्रँच अंतर्गत कल्याण क्राईम ब्रँच युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करण्यात आले.
यावेळी गलवान येथील चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली व कोरोनाच्या विरोधात आपत्कालीन परिस्थितीत लढून प्राण गमावलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देऊन जे कोरोना बाधित आहेत व उपचार घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली .
 
आपल्या भारतीय सैनिकांच्या गौरवाचा इतिहास सांगत त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसून भारतीय सैनिक अशा भ्याड हल्ल्यांना तोंड देण्यास समर्थ असून भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो राष्ट्रप्रेमी व तरुण तयार होतील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन म्हणाले तर क्राईम बॉर्डर परिवाराने असेच सामाजिक उपक्रम राबवून वृत्तपत्र सृष्टीचा वेगळा ठसा उमटवावा. असे बोलून क्राईम बॉर्डर व (एनजीओ) क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे आणि टीमचे कौतुक करीत सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या .
 
यावेळी मुख्य संपादक राजेंद्र वखरे ज्ञयांनी क्राईम ब्रँच कल्याण युनिट ३ चे व.पो.नि. संजू जॉन यांना सेवा योद्धा सन्मानपत्राद्वारे *कोरोना योद्धा सन्मान पत्र* प्रदान करून सन्मानित केले. तदनंतर या दोघं मान्यवरांच्या हस्ते एपीआय भूषण दायमा, पो.उप.निरी.नितीन मुदगून, शरद पंजे, पो.हवा.राजेंद्र घोलप , दत्‍ताराम भोसले, विश्वास चव्हाण,पो.ना. राजेंद्र खिलारे, हरिश्चंद्र बंगारा, प्रकाश पाटील,म.पो.ना. चित्रा इरपाचे, पो.शि. अजित राजपूत, मंगेश शिर्के, राहुल ईशी या सर्वांना सन्मानित करण्यात आले.