शहापूर तालुक्यातही ख्रिश्चन धर्म प्रसारकानीं केला प्रवेश, हिंदु रक्षणकर्ते  झोपलेत का?

अनिल घोडविंदे    29-Jun-2020
Total Views |

- आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केलं जातंय धर्मांतर, वाड्या-पाड्यांमध्ये उभे राहत आहेत चर्च

शहापूर : मराठी ख्रिश्चन किंवा मराठी ख्रिस्ती हा ख्रिश्चन धर्म आचरणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषक समूह आहे. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - पहिले ईस्ट इंडियन ख्रिश्चन, जे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूल निवासी आहेत व दुसरे हिंदूधर्मातून धर्मांतरित झालेले, प्रामुख्याने अहमदनगर, सोलापूर, पुणे नाशिक आणि औरंगाबाद येथील, मराठी ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्तींची लोकसंख्या ०.९६% (सुमारे १%) आहे.

Christi-400x270_1 &n
 
इंग्रजाच्या काळात १८व्या शतकात काही लोकांनी मिशनरिचा कार्याने प्रभावित होऊन धर्मांतर केले, त्यामधल्या जातीच्या लोकांबरोबर काही ब्राह्मण कुटुंबांनीही धर्मपरिवर्तन केले. त्यात ना. वा. टिळक. पंडिता रमाबाई आणि रामकृष्ण मोडक होते. ह्या ब्राह्मणांचा ख्रिस्ती समाजावर खूपच प्रभाव पडला, ना. वा. टिळकांनी लीहलेली गीते आणि भजने चर्च मध्ये भक्तिगीते म्हणून आज ही गायले जातात. पालघर तालुक्यातील तलासरी, वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार या आदिवासी तालुक्यात सुरू असलेले धर्मांतराचे लोण आता ठाणे जिल्ह्यात देखील पोहचले आहे, या जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यात आदिवासी परिसरा या ख्रिश्चन मिशनरिंचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. शहापूर तालुक्यातील कसारा, डोलखांब व खर्डी विभागात देखील हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करणाऱ्या हिंदूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, विशेष करून आदिवासी समाज या ख्रिश्चन धर्म प्रचारकांच्या भूल थापाना बळी पडताना दिसत आहे, कारण हे धर्म प्रचारक कुणी फादर नाहीत तर ते इतर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित तरुणांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, तेच तरुण आता आदिवासी समाजातील वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्माचे प्रचारक झाले आहेत.
 
आदिवासी समाजातील काही देव भोळ्या नागरिकांना शोधून त्यांच्या सोबत प्रभू येशु च्या बाबत गप्पा मारायच्या त्यानंतर येथील पाड्यातील महिला, मुली, पुरुष, यांची प्रथम मीटिंग घेयायची या मीटिंग मध्ये त्यांना वेग-वेगळी आमिष दाखवायची त्यानंतर या मिटिगांचे हळू हळू बैठकीत रूपांतर करायचे व दर पंधरा दिवसांनी बैठक घ्यायची या मध्ये प्रभू येशूची महती सांगायची, ख्रिश्चन प्रार्थना (प्रेअर) म्हणायला लावायची, आणि हा समाज इतर समाजापेक्षा छोटा असून सुद्धा कसा पुढारलेला आहे, हा समाज कसा गरिबीवर मात करून मोठा झाला आहे, याची उदाहरण देऊन उपस्थित असलेल्या हिंदू मुलां-मुलीं मध्ये या समाजा बद्दल आदर निर्माण करायचा मग याच युवा पिढी सोबत घेऊन हे धर्मप्रचारक खेड्या-पाड्यात फिरून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात.
 
जे ख्रिश्चन धर्मात प्रवेश करतील त्यांना पक्के घर बांधून देयायचं आणि ज्यांची घरं पक्की असतील त्यांना पन्नास हजार रोख देयायचे यामुळे येथील काही आदिवासी समाज याला बळी पडला आहे, त्यांचं धर्मांतर देखील झाले आहे तर काही आदिवासी पाड्यांमध्ये चर्च देखील उभे राहिले आहेत, पण या हिंदू असलेल्या आदिवासी समाजावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची वेळ का आली याचं उत्तर कुणी शोधणार आहे की नाही, मग अशा वेळी आदिवासी समाजाचे नेते म्हणून मिरवणारे नक्की कुठे गायब होतात, ते आदिवासी समाजामध्ये उदभोदन का करत नाहीत, या समाजातील गरीब अधिक गरीब होत चालला आहे शासनाच्या लाखोंच्या योजना अजून देखील त्यांच्या पर्यंत पोहचत नाही म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो आहे का?
 
हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतो परंतु धर्मांतर केल्या नंतर या आदिवासी समाजाला मिळणाऱ्या योजना बंद होणार ही माहिती असून देखील एव्हडं मोठं पाऊल येथील आदिवासी समाज का उचलतो आहे, त्यांची आर्थिक, सामाजिक, परिस्थिती उंचावण्यास शासन अपयशी ठरत आहे का? आणि या परिस्थिती ही हिंदू रक्षणकर्ते म्हणून गमजा मारणारे, हिंदू संघटना, नेहमी हिंदू च्या नावाने मतं मागणाऱ्या पक्षांचे नेते झोपले आहेत का? कोण रोखणार हे धर्मांतर, की हिंदू धर्माला आता वाली कुणी राहिला आहे की नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत, या संपूर्ण परिस्थिती चा अवलोकन केलं तर हिंदू समाजातील काही आदिवासी समाज ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत आहे त्यांना वेळीच रोखलं नाही तर हिंदू धर्मातील इतर समाज देखील एक दिवस धर्मांतर करतील आणि तेव्हाच हिंदू रक्षकांचे डोळे उघडतील का?