भिवंडी व शहापूर मध्ये कोरोना चा कहर!

जनदूत टिम    27-Jun-2020
Total Views |

- आपत्ती व्यवस्थापन सुस्त आणि वसुलीत व्यस्त!
- निष्क्रियतेचा ठपका ठेवून भिवंडी आयुक्त अष्टेकर यांची उचलबांगडी परंतू निष्क्रिय तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी यांना कोणाचे अभय?

ठाणे- जागतिक महामारी ने देश उधवस्थ होत असताना प्रत्येक राज्य शासन या महामारीला कसे रोखता येईल या साठी उपाय योजनांन मध्ये व्यस्थ आहे ,परंतु म्हणतात ना राज्याचे पॅकेज आणि गरिबाला ठेंगा असेच चित्र सध्या सगळी कडे पहायला मिळते
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शहापूर तालुका हा लोकसंख्येचा दृष्टीने दुर्गम समजला जातो ,भिवंडीत लुम, खाणी, गोदामे ,यांचा मोठा भार असल्यामुळे या तालुक्यात येण्या साठी प्रत्येक अधिकारी स्पर्धा करून वरिष्ठ स्तरावर मोठा पॅकेज देऊन रुजू होतो त्यामुळे भिवंडीत येणार प्रत्येक अधिकारी हा गब्बर होतो असेच चित्र पाहायला मिळते.
 
Nilima_1  H x W
 
भिवंडीत कोरोनाचा आकडा 2 हजार पार करून गेल्या मुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे ,आपत्ती व्यवस्थापन समिती सपशेल फेल झाल्यामुळेच भिवंडीत कोरोनाचा आकडा वाढत असल्या मुळे निष्क्रिय अधिकाऱ्यांची उचल बांगडी करा अशी मागणी तालुक्यातून जोर धरू लागली आहे,याच अनुषंगाने निष्क्रियतेचा ठपका ठेवून भिवंडी पालिका आयुक्तांची बदली करण्यात आली परंतु तहसीलदार गायकवाड वर कोणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तहसीलदार हे करोडो चा हप्तेखोरीत मशगुल असल्यानेच तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येते.
 
भिवंडी तालुका हा ग्रामीण भाग म्हणून गणला जातो ,आधी सुरक्षित असलेला ग्रामीण पट्टा आता कोरोनाचा विळख्यात असताना तहसीलदारांचा अधिकारात असणारे मंडळ अधिकारी,तलाठी हे महिनोन महिने गायब असल्याचे चित्र सगळी कडे पाहायला मिळते परंतु तहसीलदार मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसतात, तहसीलदारांचे मंडळ अधिकारी तलाठी हे माती माफिया ,खाण माफिया यांची हुजरेगिरी करतानाच दिसून येतात त्यामुळे तहसीलदार तलाठी हे एकत्र मिळून मिसळून माफियांची हुजरेगिरी करतात का अशी चर्चा रंगू लागली आहे.
 
gaijwad_1  H x
 
तहसीलदार गायकवाड चा अकार्यक्षमते मुळेच तालुका ह्या संकटाला तोंड देतंय ,त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून तहसीलदारांची उचल बांगडी करून तालुक्याला वाचवावे असे जनमत तयार होऊ लागले आहे,दीड कोटींचा जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदार गायकवाड यांचावर उच्च न्यायालयात 420 नुसार खटला सुरु असून न्यायालयाने नुकताच त्यांना या प्रकरणातून माफ करण्यास नकार देत त्यांच्यावरील केस मागे घेण्यास नकार दिला ,असा भ्रष्ट अधिकारी तालुक्याचे काय भले करणार हेच लोकांचे म्हणणे आहे.
 
भिवंडी प्रमाणेच शहापूर तालुका देखील मोठ्या प्रमाणात कोरोना ने वेढला असून तहसीलदार सूर्यवंशी या देखील आपत्ती व्यवस्थापनात सपशेल फेल झाल्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे,,कोरोनाचा आकडा वाढत असताना तहसीलदार सूर्यवंशी ह्या हम करे सो कायदा अशा वागत असून ,प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अरेरावी करतात,माहिती देण्यास टाळाटाळ करतात ,प्रोटोकॉल चा विरोधात असतात आशा एक ना अनेक तक्रारी असताना शहापूर चे लोक प्रतिनिधी विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी त्यांचा बदलीची शिफारस केली असताना देखील कारवाई होत नसल्यामुळे तहसीलदारांचे राजकीय वजन आमदार दरोडा यांचा पेक्षा मोठे आहे का आशा चर्चा रंगू लागल्या आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन सुस्त आणि वसुलीत व्यस्त! असे हे आपत्ती व्यवस्थापनात फेल झालेल्या तहसीलदारांची लोकप्रतिधी बदली व्हावी म्हणून शिफारस करून देखील वरीष्ठ दखल घेत नसल्यामुळे आमदार दौलत दरोडा हे उपोषण करणार असल्याची देखील चर्चा रंगू लागल्याने एकच खळबळ माजली आहे.