शहापूरच्या भ्रष्टाचारी बीडीओची विभागीय चौकशी करा !

जनदूत टिम    26-Jun-2020
Total Views |

- वासिंदचा लाचखोर ग्रामसेवक थोरात ला पंचायत समितीचे अभय?
- सदस्यांच्या तक्रारींवरही का होत नाही कारवाई

वासिंद : शहापूर तालुक्यातील श्रीमंत ग्राम पंचायत म्हणून वासिंद ग्राम पंचायत चा नाव लौकिक असताना गेले अनेक दिवस वारंवार व्यवस्थापनात फेल होण्याचा ठपका ग्राम पंचायत चा माथी पडतोय मग तो रस्त्यानं मधील जीव घेण्या खड्यांचा प्रश्न असो की की कचरा व्यवस्थापनाचा की कोरोणा उपाय योजनांचा वासिंद ग्राम पंचायत सर्वच स्तरावर अपयशी होताना दिसून येत आहे. वासिंद ग्राम पंचायत मध्ये होणाऱ्या निवड नुकांमध्ये लाखोंचा चुराडा करणारे उमेदवार निवडून आल्यावर निष्क्रिय का होतात हाच प्रश्न वासिंद मधील सर्व समान्यांमध्ये पडला असून वासिंद चे भवितव्य चे पुढे काय होणार हीच चिंता लोकांना लागून राहिली आहे.

Thorat_1  H x W 
 
वासिंद मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असताना आपत्ती व्यवस्थापनात सपशेल फेल झालेली ग्राम पंचायत आता एकमेकांवर चिखल फेल करत असल्याचे चित्र समोर येत आहे. ग्राम पंचायत मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून असलेले ग्राम विकास अधिकारी थोरात नवाबी थाटात राहत असल्याच्या वारंवार तक्रारी ग्रामस्थांकडून होत असताना आता ग्राम पंचायत सदस्यांकडूनच देखील तक्रारी होताना दिसून येत असल्या मुळे एकच खळबळ माजली आहे. ग्राम पंचायत सदस्य संजना संदीप पाटील यांनी ग्राम सेवक थोरात यांची वरिष्ठ स्तरावर तक्रार करून ग्रामसेवक हे ग्राम पंचायत मध्ये वारंवार गैर हजार राहतात ,मासिक सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत ,मागील सभेचे इतिवृत्त चालू सभेत देत नाहीत त्यामुळे मला माझ्या वार्डातील कामे करता येत नाहीत असे सदस्य पाटील यांचे म्हणणे असून ग्राम सेवकांवर कारवाई व्हावी अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिप ठाणे यांचा कडे केली असून त्यांना पाठबळ देणाऱ्या पंचायत समिती गटविकास अधिऱ्यांची देखील चौकशी व्हावी असे तक्रारीत म्हटले आहे.
 
ग्रामसेवक थोरात हे २०१४ पासून वासिंद ग्राम पंचायत मध्ये कार्यरत असून अनेक घोटाळ्यामुळे ते वादग्रस्त राहिले आहेत, शेकडो तक्रारी जाऊन सुद्धा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नसल्या मुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्राम सेवक थोरात हे नियमबाह्य अनेक वर्षे एकाच ग्राम पंचायत मध्ये कसे , २-२ महिने कार्यालयात हजर नसतात. हजर असल्याचा नोंदी करतात,तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना धमक्या देतात. आशा एक ना अनेक तक्रारी ग्रामस्थांना कडून गेली अनेक वर्षे होत असताना पंचायत समिती चे गट विकास अधिकारी भवारी त्यांना चिरी मिरी घेऊन अभय देत असावं ग्रामस्थांचे
म्हणणे आहे.
 
मोठी ग्रामपंचायत, औद्योगिक वारसा ,मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकासकामे या साठी प्रसिद्ध असलेली सोन्याची खाण वासिंद ग्राम पंचायत मिळाल्या मुळेच थोरात हे वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांना मॅनेज करून वर्षानु - वर्षे एकाच ठिकाणी राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 
ग्रामस्थांचा म्हणण्या नुसार थोरतांचा विकास झाला परंतु ग्राम पंचायतचा विकास खुंटला त्या मुळे या नियमबाह्य भ्रष्ट अधिकाऱ्याची लवकरात लवकर उचल बांगडी करावी व त्यांना अभय देणाऱ्या पंचायत गटविकास अधिकाऱ्यांची देखील विभागीय चौकशी व्हावी असे ग्रामस्थांचे म्हणणे असून जिल्हा परिषद ठाणे यावर काय कारवाई करते हे बघण्या जोगे असेल.