कंत्राटी कामगार दोन महिन्यापासून वेतना पासून वंचित,भिंवडी पालिकेतील कामगांराचे हाल,आयूक्त डॉ पंकज आसिया लक्ष देतील काय?

रोहिदास पाटील    25-Jun-2020
Total Views |
अनगांव : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आसतानाही कामार आपला जीव धोक्यात घालून महत्वाची भूमिकाबजावत आसतानाही भिंवडी महापालिकेत पाणीपुरवठा विभागात पाईपलाईन ,बोरवेल निगा दूरूस्ती व वाँलमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगांराना एप्रील, मे,या दोन महिन्याचा पगार मिळाळा नाही. या कामगारांचा थकीत पगार किमान वेतनानूसार न दिल्यास आयूक्तांच्या दालना समोरच आदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आयूक्त डाँ पंकज आसिया यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
 
corona-virus001-5_1 
 
गेल्या पंधरा वर्षापासून पाणीपुरवठा विभागात पाईपलाईन ,बोरवेल निगादूरूस्ती,फिल्टर,व वालमन म्हणून काम करणा-या कामगांराना किमान वेतन कायद्यानूसार देण्यात यावे या करिता पालिका सभाग्रहात कामगार संघटनेच्या वतीने पाच फ्रेब्रूवारी रोजी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा विवेक पंडित याच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली,या वेली पालिका आयूक्त डॉ प्रविण अष्टीकर यांनी कामगारांचा थकीत वेतनासह सर्व सोइसूविधा देणार आसल्याची माहिती दिली होती,तशा सूचना पालिका उपायूक्त दिपक कूरलेकर,पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता एल पी गायकवाड शाखाअभियंता संदिप पटनावर यांना दिल्या.
 
पालिकेचे संबधित अधिकारी दूर्लक्ष करीत आसल्याने यांची चौकशी करून संबधीतांवर कारवाई करण्याच्या सूचना आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी भिंवडीचे सहाय्यक कामगार आयूक्त दिनेश दाभाडे,कामगार अधिकारी गोपाळ पाटील यांना दिले,त्या नंतर तीन महिन्याचा पगार देण्यात आला ,मात्र एप्रिल व मे ,या दोन महिन्याचा पगार कामगांराना देण्यात आला नाही,तो मिळावा या करिता आयूक्त प्रविण अष्टीकर यांची भेट घेऊन चर्चा केली त्यांनी संबधीत अधिका-यांना थकीत वेतन देण्याच्या सूचना दिले आहेत,तरी कामगारांना वेतन मिळाले नसल्याने संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन ते न मिळाल्यास आयूक्ताचे दालनासमोरच आदोलन करणार आसल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर ठाणेजिल्हाअध्यक्षा अशोक सापटे, श्रमजीवी कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहिदास पाटील यांनी दिला आहे.
 
दरम्यान पालिकेचे नवनियुक्त आयूक्त डाँ पंकज आसिया यांनी कामगाच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहिदास पाटील यांनी केली आहे. भिंवडी शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आसतानाही गेली तीन महिने कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करित आहेत,देशात राज्यात लाँकडाऊन सारखी भीषन परिस्थिती आसतानाही कामगार दिवसरात्र कोरोनाच्या लढाईत सच्या कोरोना योध्याची भूमिका बाजावत आहेत,मात्र याच कोरोना योध्याच अता दोन महिन्याच वेतन थकल्याने त्याच्यावर उपासमारीची वेल आली आहे.