जनतेच्या हृदयातील नेता, संर्घषयोद्धा बबनदादा हरणे म्हणजे चालत - बोलत मंञालय

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |

- बबनदादा हरणे यांच्या वाढदीवसानिमित्त एक विचारधारा ने जनतेच्या मनातील बबणदांदाच्या व्यक्तीमत्वाचे उलगडलेले पैलू

 
शहापूर सारख्या ग्रामीण भागातील एक युवक स्वःकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक पटलावर आपले स्थान निर्माण कर तो तेव्हा खर्या अर्थाने युवकांचा आयडॉल कसा असावा तेव्हा एकच नाव पुढे येत संर्घषयोद्धा बबन हरणे.
 
Baban Harne_1  
 
घराण्याला कोणतिही राजकीय पाश्वभृमी नसताना बबनदादा हरणे यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरवात ही पञकारीतेपासून केली आणी ज्या काळी ठरावीक लोकांची मक्तेदारी शहापूरच्या राजकीय , तथा व्यवसायीक पटलावर होती तेव्हा बबनदादानी अन्याया विरोधात वाचा फोडत झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्याचे काम केले, भुमिपुञांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली, युवकामध्ये स्वाभिमान जागा करून आत्मसन्माण जागृत करण्याचे काम त्यांनी केले .
 
Baban Harne 01_1 &nb
 
समाजपरीर्तनाची विचारधारा जनमाणसांत रूजविताना त्यांच्या वाट्याला आलेला संर्घष हा बोलण्या व लिहण्याईतका सोपा तर मुळीच नाही . रूळलेल्या वाटेवर सारेच चालतात पंरतु अनेक अडथळे पार पाडून एखादी नविन वाट जो निर्माण करतो तोच अनेकांना प्रेरणादायी ठरत असतो. संकटे आली म्हणून बबनदादा थांबले नाहीत , घाबरले तर मुळीच नाहीत या उलट जिताना बडा संर्घष उतणी बडी जित हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. बबनदादांनी ज्या विषयाचे आंदोलन हातात घेतले ते त्यांनी पुर्णत्वास नेले ही त्यांची खरी ओळख . समृद्धीमहामार्गाच्या आंदोलनाने त्यांचे नेतृत्व हे महाराष्ट्र राज्य स्थरावर लक्षवेधी ठरले .
 
Baban Harne 02_1 &nb
 
खुद्ध मा. शरदचंद्रजी पवार साहेबांनी या शेतकरी पुञाच्या नेतृत्वाची दखल घेऊन व समृद्धी महामार्गात भुमिहीण होणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाबाबत शेतकरी परीषद आयोजित केली या मध्ये बबनदादांचा सहभाग हा मह्त्वाचा ठरला. यांजबरोब मा.खासदार राजू शेट्टी, मा.खासदार सुप्रियाताई सुळेमा.मंञी धनंजय मुंडे, सांसारख्या अनेक नेत्यांनी तथा मंञ्यांनी बबनदादांच्या नेतृत्वाचे अचूक गुण हेरून त्यांनी हाती घेतलेल्या आंदोलनाला वेळोवेळी बळ देण्याचे काम केले. स्वच्छ चारीञ्य व निस्वार्थ समाजसेवेचा वसा हाती घेतलेला पाहता महाराष्ट्रातील अनेक IS व IPS अधिकारी बबनदांदी जनतेच्या नेलेल्या प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासाठी मदत करतात हे आमच्यासह अनेकांनी अनूभवलेले आहे. आज बबनदादांची ओळख म्हणजे चालता बोलता मंञालय म्हणून आहे .ग्रामपंचायतीपासून ते मंञालयापर्यंतची कामे एका फोनवर त्यांच्या होतात हे अनेकांनी अनूभवले आहे.
 
Baban Harne 03_1 &nb
 
शैक्षणिक व सामाजिक क्षेञातील योगदान पाहता तसेच गोर गरीब, कष्टकरी जनतेच्या प्रती त्यांची तळमळ पाहता अनाथांची माय सिंधूताई (माई) सपकाळ बबनदादा हरणे यांना आपले माणसपुञ माणत आहे.अनेक व्याख्यान कार्यक्रमात माई नेहमी म्हणते माझं बबन नावाचं लेकरू शेतकऱ्यांन साठी, कष्टकऱ्यांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रतिकृल परीस्थितीत लढत आहे हे परमेश्वरा त्याला उंदड आयुष्य दे ! आणी हेच आशीर्वाद दादांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
 
एक खंत -महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा ED ची चौकशी शेतकरी पुञाची झाली असेल तर ती बबनदादांची परंतु ज्याला कर नाही त्याला डर कशाला आणि यातूनही ते सही सलामत निष्कंलकीत पद्धतीने त्यांना क्लीन चिट मिळाली तो संर्घषयोद्धा म्हणजे बबनदादा हरणे दांदाचे सामाजिक काम पाहता असे वाटतय की सुदैव म्हणावे की दुदैव हा योद्धा शहापूरच्या भुमित जन्माला आला ? हेच काम त्यांनी जर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ,विर्दभ या भुमित केले असते तर बबनदांदाच्या कार्याची दखल घेऊन ते आज मंञिमंडळात म्हणा नाहीतर महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत हे नेतृत्व दिसले असते.
 
परंतु धुतराष्ट्रासारखी डोळ्यावर झापड बांधलेल्या काही माणसांना आपल्याच माणसांची किंमत, त्यांची बौद्धीकक्षमता ,त्यांच्या अंगी असलेले नेतृत्वगुण दिसत नाहीत तेव्हा मणाला खंत वाटते. असो शेवटी तळागाळातील जनतेच्या न्याय मंदीरात चांगले वाईट यांचे मुल्यमापण होत असते तेव्हा आपला माणूस जेव्हा जनतेच्या हृदयावर अधिराज्य आपल्या नेतृत्वगुणांने निर्माण करतो तेव्हा बबनदादा आपल्या नेतृत्वगुणांचा आम्हांला अभिमान वाटतोय. आपल्या वाढदीवसाच्या शुभदिनी महाराष्ट्रातील आई कुलस्वामिनी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय हे माते या ध्येयवेड्या आमच्या भावाला (दादाला) संर्घंषयोद्याला उंदड आयुष्य दे ! सामर्थ्य दे ! कारण अजून अनेक दुर्बल, वंचितघटकांना न्याय हक्कासाठी बबनदादा हरणे यांच्या नेतृत्वाची गरज आहे.
 
▪शेतकरी नेते ,सामाजिक कार्यकर्ते बबनदादा हरणे यांचा वाढदिवस अनाथांची माय डॉ.सिंधूताई (माई) सपकाळ यांच्या पुणे येथिल आश्रमात वाढदीवस साजरा.
 
▪संर्घषयोद्धा बबनदादा हरणे यांचा वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी जोपासत अनाथांची माय डॉ.सिधूताई (माई) सपकाळ यांच्या आश्रमात अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला. या वेळी बबनदादा हरणे मिञ परीवाराच्या माध्यमातून आश्रमामध्ये अन्नधान्य व जिवणआवश्यक वस्तू , तसेच शाळेय विद्यार्थी यांसाठी शैक्षणिक साहीत्य व स्वःता बबनदादा हरणे यांनी आश्रमास भरीव आर्थिक मदत केली.
 
विशेष म्हणजे शाळेय विद्यार्थी यांना वाटप करण्यात येणाऱ्या शाळेय वह्यांचे वाटपांचा शुभारंभ माईंच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच गरीब व गरजू कुटूबांना जिवणआवश्यक वस्थूंचे वाटप ही नडगाव, शिरगांव, बांधनापाडा, साकृर्ली, कांबा, गुंडे, वालशेत इत्यादी गावांत वाटप करण्यात आले. या विविध कार्यक्रमाच्या यशस्वितेतेसाठी बबन हरणे मिञ परीवाराच्या सभासदांनी विशेष मेहणत घेतली.