गुरवली मधील अनधिकृत मोबाईल टॉवरला विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांचे अभय?

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |

- अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणी साठी लाखो रुपयांची देवाण घेवाण झाली असल्याचा तक्रारदार यांचा आरोपं
- घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवून विस्तार अधिकारी विशाखा परटोळे व गटविकास अधिकारी पालवे यांचा विभागीय चौकशी साठी मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण : ग्राम पंचायत अधिकार क्षेत्रात सातबारा मध्ये बांधकामास अथवा कुठल्या ही प्रकारचा स्थावर मालमत्ता उभारणीचे अधिकार शासन स्तरावरून काढून घेतले असताना गुरवली येथील ग्रामसेवक गणपत जाधव यांनी अनधिकृत मोबाईल टॉवर ला नाहरकत देऊन मोबाईल टॉवर उभा राहिल्या मुळे या प्रकरणात पंचायत समिती चे अधिकारी सहभागी होऊन मोठा घोटाळा झाल्याची चर्चा रंगू लागल्या मुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
 
Mobile TOwer_1  
 
कल्याण मधील गुरवली गावा मध्ये समीर बाळाराम देशमुख आणि निलेश बाळाराम देशमुख यांनी जिओ कंपनी चा मोबाईल टॉवर उभारणी साठी ग्राम पंचायत गुरवली येथे अर्ज केला होता परंतु त्यावर त्यांना ग्रामसेवक यांनी ना हरकत दाखल दिला परंतु त्यावर तक्रारदार अरुण चिंधाराम देशमुख यांनी तक्रार दाखल केल्या नंतर त्यांना पुरावे सादर करण्यास संगीतले त्यावर तक्रार दार यांनी पुरावे सादर केले असताना देखील त्यांचा तक्रारींवर गांभीर्य पूर्वक पाहिले गेले नाही ,तसेच कोणते ही निकष न तपासता आणि ग्राम पंचायत ला अधिकार नसताना त्यांनी ना हरकत दाखला देऊ केला.
 
या संदर्भात पंचायत समिती कल्याण येथे तक्रार केली असताना विस्तार अधिकारी विशाखा परटोळे ह्या स्थळ पाहणी साठी आल्या असताना त्यांनी मोबाईल टॉवर अनधिकृत कसा अहवाल देण्या ऐवजी ग्राम पंचायत सदस्य यांचा घरी पाहुणचार घेत तक्रारदार यांना सामील न करता तक्रार दार यांचावर वैयक्तिक ताशेरे ओढवून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न केले या मध्ये हाच अहवाल कायम ठेवून गटविकास अधिकारी पालवे यांनी देखील अनधिकृत टॉवर ला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण केली.
 
गुरवली येथील मोबाईल टॉवर अनधिकृत असताना त्या बद्दल अहवालात का नमूद केले नाही अहवाल मध्ये तक्रारदार यांना सामील करणे बंधन कारक असताना तक्रारदार यांना का बोलावले गेले नाही त्यांना जबाब का नोंदवला गेला नाही अशा एक ना अनेक शंकांनी हा खूप मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे तक्रार दार यांचा आरोपांना एकच खळबळ माजली आहे
मोबाईल टॉवर अनधिकृत असताना देखील पंचायत समिती कल्याण त्याला का अभय देते जागा बिनशेती न करता असा मोबाईल टॉवर उभारला जाऊ शकतो का? सदर टॉवर उभारणी कामी आपत्ती व्यवस्थापन समितीची परवानगी घेतली गेली आहे का ?
फायर ब्रिगेड ची परवानगी घेतली गेली आहे का? टॉवर उभारणी वेळी वस्ती ,शाळा ,चिमण्या यांचावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला गेला आहे का?
 
प्रदूषण नियंत्रण मंडळाला या बद्दल अहवाल सादर करून त्यांची ना हरकत घेतली गेली गेली आहे का? अशा तक्रार दार यांचा अनेक बाबी अनुत्तरित असताना ग्राम सेवक गणपत भालचंद्र जाधव यांनी अधिकार नसताना ही परवानगी देऊन आर्थिक घोटाळा केला असल्याचा तक्रारदार यांचा आरोप आहे ,मोबाईल टॉवर हटवण्या ऐवजी त्याला पाठबळ देण्याचे काम पंचायत समिती मार्फत केले जात असल्याचा अहवालातून स्पष्ट होत आहे.
 
गेले अनेक दिवस पंचायत समिती कल्याण येथे भ्रष्टचाराची मालिका सुरु असताना ह्या नवीन आरोपांची भर पडल्यामुळे त्यावर ही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तक्रारदार अरुण चिंधाराम देशमुख यांना मोबाईल टॉवर मुले आणि ग्राम पंचायत मधील बाहुबली आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पंचायत समिती अधिकारी यांचा मुळे जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांनी ह्या विषयाची सखोल चौकशी व्हावी या साठी तसेच या प्रकरणातील पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांची विभागीय चौकशी व्हावि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांचा कडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
 
या विषयाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागून न्याय मिळाला नाही तर मी आणि माझे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे उपोषणाला बसणार आहोत असे तक्रार दार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालय यावर काय भूमिका घेते यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.