पडघा ग्रामपंचायत मध्ये चाललंय तरी काय?

जनदूत टिम    23-Jun-2020
Total Views |

- तक्रार करणाऱ्या ग्रामस्थाला ग्राम पंचायत कर्मचाऱ्या कडून जीवे मारण्याची धमकी
- ग्राम पंचायत चा घंटा गाड्यांमधून अनधिकृत बांधकामांना सामान पुरवला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोपांनी एकच खळबळ
- सरपंच पराग पाटोळे आणि ग्राम सेवक दांडकर यांचा मनमानी कारभारा विरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोष
 

पडघा : एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना पडघा ग्राम पंचायत मध्ये वेगळ्याच गौड बंगालमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरण्यास सुरवात झाली आहे, गेले अनेक दिवस पडघा ग्रामस्थांकडून ग्राम पंचायत चे अनेक घोटाळे बाहेर काढण्याचे सत्र सुरू असताना आता तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यामुळे एकाच खळबळ माजली आहे, पडघ्यातील आरक्षित सरकारी जागा ग्राम पंचायत चे सरपंच व ग्राम सेवक यांनी संगनमताने अनधिकृत बांधकामांना दिली असल्याची राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष यांनी तक्रार केल्या नंतर दैनिक जनदुत ने बातमी प्रसिद्ध केल्या नंतर तहसीलदार गायकवाड यांनी पडघा येथे भेट देऊन सर्वे नंबर १०१ मधील बांधकाम ७ दिवसाचा आत तोडण्याचे आश्वासन देऊन अनधिकृत बांधकामे करणार्यांना नोटीस बजावली तसेच पडघ्यात परवानगी नसताना सुरु असलेल्या बांधकामांचे काय हा प्रश्न देखील ग्रामस्थांकडून विचारला जाऊ लागला आहे.
 
Patole_1  H x W
 
ग्राम पंचायत मनमानी करत असून आता ग्राम पंचायत मध्ये कचरा व्यवस्थापन साठी घंटा गाड्या अस्तित्वात असून त्यांचा वापर कर्मचारी वैयक्तिक आणि अनधिकृत कामा साठी वापरत असल्याचा विडिओ ग्रामस्थांकडून समोर येत आहे. कर्मचारी तांबे हे ड्युटी वर असताना त्यांनी मनमानी करत ग्रामपंचायत ची गाडी अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन विटा वगैरे खाली करत असताना राष्ट्रवादी चे अध्यक्ष रणजित साळुंखे यांनी त्याचा व्हिडीओ बनवून फ़ोन वर जाब विचारला त्यावर कर्मचारी तांबे यांनी माफी मागून माझी चूक झाली असून मी माफी मागतो विडिओ डिलिट कर अशी विनंती केली,परंतू व्हिडीओ व्हायरल झाला नंतर कर्मचारी तांबे यांनी घुमजाव करत मला ब्लॅक मेल करण्या साठी हा विडिओ बनवला असून माझी काही चूक नाही असे पोलीस स्टेशन पडघा येथे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
परंतु हे प्रकरण थांबायचे नाव घेत नाही तक्रार दार साळुंखे यांनी सदर बाब दाबून टाकण्या साठी माझ्यावर दबाव आणला जाऊन कर्मचारी तांबे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल माझा जीवाला धोका असल्याची उलट फिर्याद दाखल केली आहे, त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचारी हे लोक सेवक आहेत की गाव गुंड असा सुर उमटू लागला असून कर्मचाऱ्यांवर ग्राम पंचायत चा वरद हस्त असल्या मुळेच ते असे कृत्य वारंवार करत असल्याच्या ग्रामस्थानचा तक्रारी आहेत.
 
ग्राम विकास अधिकारी हे ग्राम सचिव असताना ते वारंवार कर्मचाऱ्यांचा चुकांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात की ते ही चिरी मिरीचे भागीदार आहेत अशा शंका ग्रामस्थांकडून उपस्थित केल्या जात आहेत. गेले अनेक दिवस ग्रामपंचायत चे अनेक घोटाळे पुराव्यांसकट बाहेर येत असताना पंचायत समिती आणि तहसील प्रशासन कोणाचा दबावा मुळे गप्प आहेत ,ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांचावर कारवाई कधी होईल असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
 
ग्राम पंचायत मध्ये असलेले कर्मचारी तांबे आणि लिपिक तेलवने यांची केलेली भरती यात देखील गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे ,या बाबत ग्राम पंचायत चे ग्रामविकास अधिकारी दांडकर माहिती अधिकारात माहिती दडवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ पंचायत समिती प्रशासन, तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि पडघा तलाठी प्रतिभा पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.