जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार

जनदूत टिम    23-Jun-2020
Total Views |

- मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

अलिबाग : कोविड 19 मुळे जिल्ह्यातून कुशल,अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 29 व 30 जून 2020 या दोन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

online_1  H x W
 
त्यासा़ठी खाजगी आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेल्या कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टल वर दि. 27 जून 2020 पर्यंत नोटीफाइड करावीत. ज्या आस्थापनांनी यापूर्वी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्त पदे या विभागाच्या वेबपोर्टलवर दि. 27 जून पर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job)-Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व रिक्त पदे अधिसूचित करणे, या संदर्भात खाजगी आस्थापनांना काही समस्या उद्भवल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र.9820452264 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग श्री. शा. गि. पवार यांनी केले आहे.

परदेशात पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी दि. 03 जुलै पूर्वी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावेत
राज्यातील अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना परदेशात पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार सन 2020-21 शैक्षणिक वर्षात परदेशात एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, बीटेक (इंजिनिअरिंग), विज्ञान, कृषी, इतर विषयांच्या अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

scholership_1  
महाराष्ट्र राज्यात असलेल्या एकूण 29 प्रकल्प कार्यक्षेत्रासाठी पदवी शिक्षणाकरिता 2 तर पदव्युत्तर करिता 8 असे मिळून एकूण 10 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. पेण प्रकल्पांतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असून या जिल्ह्यांमधून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
तरी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, या कार्यालयातून शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करून घ्यावेत व परिपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह हे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्याकडे दि.03 जुलै 2020 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड श्री. के. बी. खेडकर यांनी केले आहे.