करोडो रुपयांचा महसुल बुडविणाऱ्या लुटारूंना तहसीलदारांचा पाठींबा

जनदूत टिम    18-Jun-2020
Total Views |

- प्रांत मोहन नळदकरच्या पाठींब्याने शक्ती ग्रुप तर्फे कपिल पटेलचे चोरधंदे

भिवंडी : डोहळे ग्रामपंचायत हद्दीत हजारो ब्रास मातीचे उत्खनन होऊन सुद्धा भिवंडी तहसीलदार गायकवाड व प्रांत मोहन नळदकर यांनी कानाडोळा करत संबंधित बिल्डर कपिल पटेल सोबत हातमिळवणी करून लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे.
 
Naladkar_1  H x
 
मौजे डोहोळे हद्दीत सर्वे नंबर 150 या गुरुचरण जमिनीला लागुन सर्वे नंबर 67, 68, 71, 72 या जमिनी शक्ती ग्रुप तर्फे कपिल पटेल यांच्या नावे आहे. सदर जमिनीवर मोठया प्रमाणात माती भराव टाकण्यात आला असुन या भरावासाठी लागणारी माती सर्वे नंबर 85, 86 या महसुल विभागाच्या शासकीय जागेतुन खणन करण्यात आली आहे.याबाबत वारंवार तक्रारी होऊन सुद्धा भिवंडी प्रांत मोहन नळदकर, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने बिनदिक्कत तथाकथित माती चोरट्यांनी माती उत्खनन सुरुच ठेवले आहे.
 
सदर डोहोळे येथील कपिल पुंजालाल पटेल व इतर व्यक्तींनी विकसित करत असलेल्या जमिनीवर शितगृह कृषीपुरक उदयोग व बिगर शेतकी प्रयोजन वापरासाठी माती भराव टाकुन जमिनीचे सपाटीकरणाचे काम लॉकडाऊनमध्येही रात्रीच्या अंधारात युद्ध पातळीवर सुरु ठेवले आहे.परंतु सदर माती भरावाला लागुन गुरचरण जमीन असल्याने या शासकीय जागेवर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असुनही महसुल विभागाचे भ्रष्ट अधिकारी प्रांत व तहसीलदार या कडे दुर्लक्ष करीत आहेत.