भिवंडीचे आपत्ती व्यवस्थापन फेल असतांना तहसीलदारची उचलबांगंडी कधी?

जनदूत टिम    17-Jun-2020
Total Views |

- पडघ्याजवळच्या बोरिवलीत मृतांचा आकडां वाढला
- बोरिवली हद्दीत किड्या मुंग्यांसारखा होतोय माणसांचा मृत्यू

ठाणे : भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी महसुल चोरट्यांशी हातमिळवणी करून करोडो रुपये कमविण्याच्या अभिलाषेमुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष असल्याचा विसर पडल्या ने पडघ्या जवळच्या बोरिवलीतील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी दररोजचा मृतांचा आकडा वाढत असतांना कोणतीही ठोस उपाययोजना न करणाऱ्या महसूल, आरोग्य प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष म्हणुन तहसीलदार गायकवाड यांनी हलगर्जीपणा केला म्हणून त्यांची उचलबांगडी कधी? असा सवाल विचारला जात आहे.
 
Smashan_1  H x
 
पडघा ग्रामस्थांच्या तक्रारी वरून गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण जग व आपला भारत देश महामारी च्या संक्रमणामुळे हवालदिल झालेला आहे. संपूर्ण जनता यामुळे भयभीत झालेली आहे.पडघे गावाशेजारील बोरिवली गावात गेल्या १५ दिवसांत २० ते २५ नागरींकांचा मृत्यू झालेला आहे. दररोज २ ते ३ मृतदेह बोरिवली गावामधून ग्रामपंचायत पडघा हद्दीतील मुस्लिम कब्रस्तानात दफनविधीसाठी आणले जातात. अशी तक्रार पडघा ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक ठाणे व भिवंडीचे प्रांत नळदकर यांच्याकडे केली आहे.
 
यामधील गुपित असे की, एरव्ही मुस्लिम बांधवांचे मृतदेह दफनविधीसाठी मनुष्य बळाचा वापर करून खड्डे खणंले जातात परंतु गेल्या १५ दिवसांत जे सी बी चा वापर करून एकाच वेळेस ४ ते ५ खड्डे खणले जात आहेत. त्या मृतदेहांच्या दफनविधीसाठी रात्री १० नंतरची वेळ का निवडली जाते अशी शंका ग्रामस्थांनी घेतली आहे. तसेच या दफनविधीसाठी १०० ते २०० नागरिक बेकायदेशीरपणे जमाव करून जात असतात. यावेळी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. 
 
याबाबत ग्रामपंचायत व महसूलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडुन कोणत्याही सुचना दिल्या जात नसुन परवानगी घेतली जात नाही. त्याचबरोबर पडघे गावात लोकडाऊन चे नियम पाळले जात आहेत, मात्र बोरिवली गावातील नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवितात असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
 
बोरिवली गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनाची टीम तहसीलदार गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली काम करीत असूनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पडघा पोलीस स्टेशन याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यास का धजावत नाहीत असा सवाल विचारला आहे. यामध्ये ग्रामपंचायत पडघा कार्यक्षमतेने कोणतीही उपाययोजना करीत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
 
दफनविधीसाठी आणलेले मृतदेह कोरोना बाधित असण्याची व यामुळे मोठ्याप्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडघा ग्रामस्थांमध्ये घबराट व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सक्त सुचना दिलेल्या असतानाही बोरिवली परिसरातील कोरोना बाबतची माहिती लपवली जात असल्याने आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शशिकांत गायकवाड यांच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.