तहसीलदार गायकवाड ने अविश्वास ठराव फेटाळला !

जनदूत टिम    16-Jun-2020
Total Views |

- त्याच पडघ्यातील अनधिकृत बांधकामाना युवानेता सरपंच पराग पाटोळे याचा आशीर्वाद
- कुंपणचं शेत खात असल्याची जनसामान्यांत चर्चा
- बेकायदेशीर बांधकाम ना हरकत दाखल्यांसाठी विकासकांकडून करोडोची भागीदारी !

पडघा : ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत ची निर्मिती केली गेली ,खेड्यात विकास व्हावा आरोग्य शिक्षण रस्ते यांचं योग्य नियोजन व्हावं या साठी त्याची जबाबदारी ग्राम पंचायतींना दिली गेली ,विकास आराखडे बनवून खेडी सुजलाम सुफलाम बनवन्यासाठी लोकशाही पद्धतीने सरपंच सदस्य यांची निवड लोकशाही पद्धतीने करून गावचे प्रतिनिधित्व सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांना दिला गेला. ठाणे जिल्ह्यातील पैसे कमविण्यासाठी आलेल्या प्रांत नळदकर आणि तहसीलदार गायकवाड यांच्या आशीर्वादाने राजरोस लुटीचा धंदा सुरु आहे.
 
Gaikwad_1  H x
 
पण म्हणतात ना कुंपणचं शेत खाते तशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे, भिवंडी मधील पडघा ही ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून समजली जाते तरुण युवा नेतृत्व पाटोळे सरपंच म्हणून विराजमान असताना पडघ्याचा विकास होईल अशी जनसामान्यांची भावना होती परंतु विकासा ऐवजी घोटाळेच बाहेर येत असल्यामुळे जनसामान्य मध्ये नाराजी पसरतेय
या भूमाफियांची हद्द झाली आहे. शासकीय जमीन घोटाळा सोबत अनधिकृत बांधकामांचा विषय सध्या जोर धरू लागला आहे. २०१७ चा शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना बांधकामांसाठी ना हरकत दाखल्याचा अधिकार काढून घेतला गेला तसेच पडघा ग्रीन झोन असताना पडघ्यात १०० कोटींची बांधकाम प्रकल्प कसे सुरू आहेत, अधिकार नसताना ना हरकत दाखले ग्रामसेवक दांडकर आणि ग्रामपंचायत कडून कसे दिले गेले , अनधिकृत बांधकामे दिवसा ढवळ्या चालू असताना ती थांबवली का गेली नाहीत असे एक ना अनेक प्रश्न सध्या लोकांचा मनात सुरु असून भूमाफिया सरपंच पराग पाटोळे यांनी आणि ग्रामसेवक दांडकर यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची बिदागी घेऊन परवानग्या दिल्याची सध्या कुजबुज ग्रामपंचायती मधील काही सदस्यांकडून मागचा कानाने ऐकू येऊ लागली असल्याची चर्चा रंगली आहे.
 
भ्रष्ट कामाने आंधळ्या झालेल्या कलेक्टर नार्वेकर, त्यांचा चेला आणि एक नंबर चा झोल करून भिवंडीत करोडो रुपये कमविण्यासाठी खासदार, आमदार यांच्या आशीर्वादाने आलेले प्रांत नळदकर आणि तहसीलदार गायकवाड यांच्या आर्थिक तडजोडीच्या आशीर्वाद असल्यामुळे सन २०१७ मध्ये परवानगी चे अधिकार काढून घेतले असताना पडघ्यात आता सुरु असलेल्या बांधकाम विकासकांना ना हरकत दाखले कसे आणि कोणत्या निकषांवर दिले गेले , ना हरकत दाखला ६ महिन्या साठी मान्य असताना २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु कशी, प्रत्येक विकासाकाकडे २०१७- २०२० मधील असलेले सरपंच ग्रामसेवक याचा सहीचे ना हरकत दाखले कसे.? असे एक ना अनेक संशयास्पद बाबी समोर येत असून विकासकांनी ना हरकत मिळवण्या साठी लाखो ओतल्याची चर्चा होत असून सरपंच पराग पाटोळे यांचावर नाराजीचा सूर जांसमान्यांमधून उमटत असून याची सविस्तवर चौकशी व्हावी या साठीची मागणी जोर धरू लागली आहे.
 
सरपंच पराग पाटोळे यांनी अनेकांबरोबर भागीदारी केली असल्यामुळे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असून महागडी गाडी ,मोबाइल कसे आणि कुठून मिळवले त्यांना मिळणाऱ्या मानधनात हे शक्य आहे का याची देखील चर्चा होत आहे . सरपंच पाटोळेआणि ग्रामसेवक दांडकर यांचा मनमानीला त्यांच्याच सदस्यांचा विरोध असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव ८सदस्यांनी आणला होता परंतु भ्रष्ट तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी तो नामंजूर करून भ्रष्टचराला पाठिंबा दिला असेच म्हणावे लागेल.