पंचायत समिती कल्याण चे प्रशासन सुस्त आणि अधिकारी मस्त !

- कैलास धमणे    16-Jun-2020
Total Views |

- गुरवली गावातील अनधिकृत मोबाईल टॉवरला पंचायत समिती कल्याण चे अभय
- गुरवली गावातील मोबाईल टॉवरच्या परवानगी साठी लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची काही ग्रामस्थांना शंका

कल्याण : ग्रामपंचात गुरवलीचे ग्रामविकास अधिकारी  गणपत भालचंद्र जाधव यांना कोणतेही अधिकार नसताना सुद्धा ग्रामपंचायत गुरवली मध्ये दिनांक २७/०९/२०१७ च्या मासिक सभेत ठराव घेऊन समीर बाळाराम देशमुख आणि निलेश बाळाराम देशमुख यांच्या सर्वे न. १५२/५ च्या जागेत रिलायन्स जिओ मोबाईल टॉवर बांधकामासाठी नाहरकत दाखला दिनांक ०९/१०/२०१७ रोजी अटी शर्तीच्या आधारे देण्यात आला.
 
KPS_1  H x W: 0 
 
ग्रामपंचायत गुरवलीने नाहरकत दाखला दिलेल्या मोबाईल टॉवरची जागा बदलण्यासाठी गावातील काही व्यक्तींनी दिनांक ३१/१०/२०१७ रोजी लेखी तक्रारी करून, टॉवरपासून गंभीर त्वचा रोग, ब्रेनहँमरेज आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात हे निदर्शनास आणून दिले. त्याअनुषंगाने दि.०३/११/२०१७ रोजी ग्रामपंचायत गुरवलीचे ग्रामविकास अधिकारी श्री. गणपत भालचंद्र जाधव यांनी तक्रारदारांना गंभीर आजाराचे पुरावे ७ दिवसाच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायला सांगितले. त्यावर तक्रारदारांनी सदर पुरावे जमा करेपर्यंत मोबाईल टॉवरच्या कामाला स्थगिती देण्यासाठी तक्रार दिली. त्यानंतर तक्रारदारांनी दि.०६/११/२०१७ रोजी टॉवरच्या दुष्परिणामचे पुरावे ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले.
 
तत्पूर्वी ग्रामपंचायत गुरवलीच्या सरपंच संगीता गुरुनाथ दळवी यांनी दि.३१/१०/२०१७ रोजीच्या मासिक सभेत पुराव्यांचे वाचन करून, ग्रामपंचायत सदस्यासोबत चर्चा करून, ग्रामपंचायतीने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे आणि आलेल्या तक्रारींमुळे समीर बाळाराम देशमुख आणि निलेश बाळाराम देशमुख यांना दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्यात आला आहे व काम बंद करावे. असे पत्र दि. ०७/११/२०१७ रोजी ग्रामपंचायत गुरवलीचे सरपंच सौ. संगिता गुरुनाथ दळवी यांच्या सही शिक्क्याने काढण्यात आले.
 
ग्रामपंचायत गुरवलीचे ग्रामविकास अधिकारी गणपत भालचंद्र जाधव आणि सरपंच नलिनी संदीप देशमुख यांनी दि. १४/०२/२०१८ रोजीच्या ग्रामसभेत ठराव घेऊन पुन्हा रिलायन्स जिओ टॉवर उभारण्यासाठी दि. २१/०३/२०१८ रोजी पुन्हा नाहरकत दाखला देण्यात आला. तत्पूर्वी तक्रारदारांनी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर टोकन क्र. DIST/ZPTH/२०१८/९५६ ह्या तक्रारींवर पंचायत समिती कल्याणच्या विस्तार अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी विशाखा परटोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत गुरवली कार्यालयात दि. २२/०२/२०१८ रोजी चौकशी झाली असता, विस्तार अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी विशाखा परटोळे यांनी एकतर्फी अभिप्राय नोंदविला आहे. आणि खोटा निष्कर्ष काढून विशाखा परटोळे यांनी तक्रारदार आणि शासनाची फसवणूक केलेली आहे.
 
शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर दिलेल्या तक्रारीचा बनावट चौकशी अहवाल पंचायत समिती कल्याण च्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या सहीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांना पाठवून तक्रार निकाली काढून सामान्य माणसाला न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम पंचायत समिती कल्याण चे गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी केले आहे.
 
■ मोबाईल टॉवरला परवानगी देताना खालील गोष्टींची कोणतीही चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी केली नाही.
◆ मोबाईल टॉवर बांधकामासाठी घेतलेला तात्पुरती N/A परवानगी.
◆ प्रदूषण खात्याची कोणतीही परवानगी न घेणे.
◆जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती आस्थापनेची कोणतीही परवानगी न घेणे.
◆ विमा न काढणे.
◆ शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी घेतलेल्या हरकत/तक्रारीची दखल न घेणे.
◆ अग्निशमन दलाची परवानगी न घेणे.
 
ग्रामपंचायत गुरवली ने दिलेल्या नाहरकत दाखल्यावर कायदेशीर हरकत येवुनसुद्धा त्या तक्रारीची कोणतीही शहानिशा/सत्यता न पाहता ग्रामपंचायत गुरवलीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी गणपत भालचंद्र जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि पंचायत समिती कल्याण च्या विस्तार अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी विशाखा परटोळे ह्या सर्वांनी संगनमत करून बेकायदेशीर मोबाईल टॉवर हा कायदेशीर असल्याचे ढोंग करून, ग्रामपंचायत गुरवलीचे ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद ठाणे अशी सर्वांची दिशाभूल/फसवणूक केलेली आहे.
 
शासनाने ग्रामपंचायतीचे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार काढून घेतलेले असताना सुद्धा ग्रामविकास अधिकारी गणपत भालचंद्र जाधव, गुरवली गावचे सरपंच संगिता गुरुनाथ दळवी आणि नलिनी संदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती कल्याणचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि विस्तार अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी विशाखा परटोळे यांनी शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नाहरकत दाखला संगनमताने दिलेला आहे.
वरील सर्व संबंधित व्यक्तीवर जिल्हा परिषद ठाणे कारवाई करणार की, ह्या सर्वाना अभय देणार, यावर सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.