व्यापक व बराच निर्दयी उपाय म्हणजे लॉकडाऊन

जनदूत टिम    16-Jun-2020
Total Views |
चार महिन्यांच्या काळात जवळ जवळ सर्व जगभर हा संसर्गजन्य रोग पसरला. सामाजिक अलगीकरणामुळे व आरोग्य व्यवस्थेच्या तोकडेपणामुळे,समाज, व्यवसाय व अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. चार महिन्यांच्या काळात जवळ जवळ सर्व जगभर हा संसर्गजन्य रोग पसरला. सामाजिक अलगीकरणामुळे व आरोग्य व्यवस्थेच्या तोकडेपणामुळे,समाज, व्यवसाय व अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत.अँथोनी फॉसी, अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट जऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन्स या संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या मते कोरोना विषाणची जागतिक साथ 'सर्वात भयानक रात्रसंकट' ठरते आहे. अँथोनी फॉसीच्या मते, ही जागतिक साथ, सामाजिक आरोग्य व्यवस्थेच्या वाढीमुळे व उपाय योजनेमुळे अटोक्यात येणार नाही.
 
Lock Down_1  H
 
बहुतेक सर्व राष्ट्रांनी लॉकडाऊन- कमी-अधिक लांबीचा व काठीण्याचा हा मार्ग वापरला. त्यातून आता, हळहळू वाढत्या संख्येने राष्ट्रबाहेर पडत आहेत. अँथोनी फाँसीच्या मते,साथीची दुसरी लाट येणे संभाव्य आहे. यावर प्रतिबंधात्मक लस हाच उपाय आहे. अर्थात, त्याच्या जोडीला औषधोपचार पद्धतीही महत्त्वाची आहे. लसीचे हजारो कोटी डोस आवश्यक पडतील. डब्ल्यूएचओच्या मते सध्या विविध ठिकाणी १०० लसींवर चाचण्या सुरू आहेत. त्यातील काही वर्षातच वापरात येतील; पण त्यापूर्वी त्यांची परिणामकारकता व सुरक्षितता - मानवी वापराच्या बाबतीत सिद्ध होणे आवश्यक आहे. या साथ रोगासंबंधी माध्यमातून व सामाजिक माध्यमातून अनेक प्रकारचे समज (गैरसमज) व रोगाच्या स्वरूपाबद्दल कलंकित्वाच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. खरे तर अशा 'गैर प्रसिद्धीचे नियंत्रण' हा धोरणाचा एक महत्त्वाचा घटक असला पाहिजे.
 
सामाजिक दुरांतरणाचा जालीम, व्यापक व बराच निर्दयी उपाय म्हणजे 'लॉकडाऊन तथा कूलपबंदी.' अशा लॉकडाऊनच्या मुख्य प्राथमिक उद्देश, सध्या उपलब्ध आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेच्या पलीकडे ताण निर्माण होऊ नये, असा आहे. पूर्वतयारीला वेळ मिळावा हाही हेतू आहे. हेतूबद्दल वाद नाही; पण प्रश्न आहे तो लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान विशेषतः उत्पादन घट, रोजगार घट, सरकार महसूल घट किमान असा करायचा? या प्रश्नांचा संबंध मुख्यतः लॉकडाऊनची लांबी व कठोरता याच्याशी येतो. याबाबतीत झालेल्या काही लाभ-खर्च अभ्यासांचा थोडक्यात आढावा आपण घेऊ.
 
सौम्य सामाजिक दुरांतरणाचा (स्वीडनप्रमाणे) कसा परिणाम होतो, यासंबंधी झालेल्या अमेरिकेतील एका अभ्यासाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. १) सामाजिक आंतरसंबंध ४० टक्के कमी करण्यासाठी धोरण ठरविले जाते. त्यात, शाळा व कार्यालये चालू राहतात. इतर सार्वजनिक जीवनातील संपर्क कठोरपणे कमी केले जातात. २) अशी व्यवस्था संपूर्ण अमेरिकेत केलीअसतीतरराष्ट्रीय उत्पन्नात७लाखकोटीडॉलर्सची घट आली असती. म्हणजेच लॉकडाऊन नसताना जेवढे उत्पन्न मिळाले असते, त्यात ७ लाख कोटी डॉलर्सची घट आली असती; पण झालेल्या मृत्यूपैकी ५० टक्के अधिक मृत्यू टाळता आले असते. त्यामुळे समाजाचा होणारा लाभ १२ लाख कोटी डॉलर्सचा झाला असता. खर्च होणाऱ्या (घट) प्रत्येक डॉलरमुळे समाजाचा १.७ डॉलर लाभ झाला असता. ३) या अभ्यासाची गृहिते आशावादी होती. म्हणजेच साथीची दसरी लाट येणार नाही, असे मानले गेले. याचाच अर्थ खरा सामाजिक लाभ दर दिसतो, त्यापेक्षा कमी असणार.
 
भारताच्या संदर्भात (तत्सम देशासाठी) लॉकडाऊनचे लाभ तुलनेने बरेच कमी असतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे :१) गरीब देशात वयस्कर माणसांची संख्या बरीच कमी असते. अशाच लोकांना सामाजिक दुरांतरणाचा फायदा होणे शक्य असते. २) अशा देशात रुग्णालय क्षमता मुळातच कमी असते. परिणामी त्या कमी पडतात. ३) अशा देशात अधिक गरीब लोक इतर अनेक प्रतिबंध क्षम रोगांना बळी पडण्याची शक्यता मोठी असते. साहजिकच 'कोव्हिड१९'च्या धोक्यात घट होण्याची त्यांना मोठे महत्त्व वाटत नाही. पूर्व अफ्रिकेतील मालावी देशाचे राष्ट्रीय नियोजन मंडळ, कोपनहेगन कॉन्सेसस व आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीज यांनी संयुक्तपणे, विकसनशील राष्ट्रांसाठी 'कोव्हिड-१९'च्या धोरणांचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
 
१) 'कोव्हिड-१९'मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण उपायांमुळे कमी होते. २) इतर आजारांपैकी एड्सची उपचार क्षमता काहीशी वाढते.३) पण मलेरिया व टीबी उपचारांची परिणामकारकता कमी होते. ४) वाहतुकीत
होणारे मृत्यूकमी होतात. ५) पण कुपोषित मुलांचे प्रमाण वाढते.६) या अभ्यासाप्रमाणे १ कोटी ९० लाख लोक संख्येच्या मालावीमध्ये ७००० मृत्यू टाळता येणे शक्य आहे.७)सर्व साधारण सामाजिक दरांतरणाचा आर्थिक आघात लक्षणीय असतो. मालावी देशासाठी असा आघात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाइतका म्हणजे ६.७ अब्ज डॉलर्स इतका असेल.
 
याचा वेगळा अर्थ असा होतो की. पुढच्या पिढीच्या राहणीमानात सामाजिक हस्तांतरण व शाळा बंद करणे व ७००० जीव वाचविणे यात निवड कशी करायची? दुसरा निवडीचा प्रश्न आहे. कुणाला वाचवयाचे? वृद्धांना का तरुणांना? आर्थिक निकषावर साहजिक तरुणाला! 'कोव्हिड-१९' साथीमध्ये मरणाऱ्यांत वृद्धांची संख्या अधिक असते; पण एड्स, मलेरिया, टी.बी., बालकुपोषण टाळल्यास अधिक काळ उत्पादकतेचा लाभ होतो.