कलेक्टर नार्वेकर आणि भिवंडी प्रांत नळदकर यांच्या मूकसंमत्तीने भूमाफियांचा धुडगूस

जनदूत टिम    15-Jun-2020
Total Views |

- भिवंडी तालुक्यातील सरकारी जमीन विक्रीत तहसीलदार गायकवाड चा आशीर्वाद !
- तरुण सरपंच पराग पाटोळे यांचा पडघा ग्रामपंचायतचा गाव विकणे हा गोरख धंदा?

भिवंडी : तालुक्यातील सर्वात मोठी आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पडघा ग्रामपंचायतीच्या भाजपच्या तरुण सरपंचाने तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याशी संगनमताने शासकीय गायरान जमीन असलेल्या सर्वे नं १०१ मधील बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्याचे प्लॉट विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यातून करोडो रुपयांची माया जमविण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करून सरपंच पदावरून बडतर्फ करून तहसीलदार गायकवाड यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजित साळुंखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
Bhiwandi Prant_1 &nb
 
सर्वे नंबर १०१ बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक यांच्या विरोधात गेल्या वर्षभर अनेक तक्रारी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असे साळुंखे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. यासर्व अतिक्रमणामागे मोठा आर्थिक व्यवहार असून त्यांच्याच आशीर्वादाने हि बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
भ्रष्ट आणि लाचार ग्रामसेवक दांडकर यांना तर साधी तक्रार ऐकायला सुद्धा वेळ नाही. त्यांनी सतत दुर्लक्ष करून टाळाटाळ करून कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ प्रशासनातील भिवंडीचे प्रांत नळदकर व जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या खिशात असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमणाला खत पाणी मिळत आहे.
 
यागोदरच अनेक ठिकाणी अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे सुरु असून असतांना आता पुन्हा सर्वे नंबर १०१ मध्ये बेकायदेशीरपणे माती उत्खनन करून जमिनीचे सपाटीकरण केले आहे. पडघा विभागात जमिनीला प्रति गुंठा भाव १५ लाख रुपये आहे. यातून अशी परस्पर अनेक एकर जमीन गायरान जमीन परस्पर विकून भ्रष्ट्राचार केला आहे. पडघा हद्दीतील इतर जमिनी धनदांडग्यांना विकण्याचा व्यवहार सुरु असून त्यामध्ये अतिक्रमण होत आहे. संपूर्ण जग कोरोना शी लढा देत असतांना त्याआड संधी साधून जाणीवपूर्वक भ्रष्ट्राचार करीत आहेत. परिपत्रकानुसार पडघा हद्दीतील गायरान जमिनीचे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हि ग्रामपंचायत चे सरपंच ग्रामसेवक यांची जबाबदारी आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार ग्रामपंचायत पडघा येथे सुरु आहे.
 
सर्वात मोठी आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पडघा ग्रामपंचायतीच्या भाजपच्या तरुण सरपंचाने कलेक्टर नार्वेकर आणि भिवंडी प्रांत नळदकर यांच्या मूकसंमत्तीने तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याशी संगनमताने शासकीय गायरान जमीन असलेल्या सर्वे नं १०१ मधील बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्याचे प्लॉट विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यातून करोडो रुपयांची माया जमविण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करून सरपंच पदावरून बडतर्फ करून तहसीलदार गायकवाड यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजित साळुंखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.