ठेकेदारीतील हावरट पणामुळे शहापूर - मुरबाड महामार्गाचे काम रखडले ?

जनदूत टिम    15-Jun-2020
Total Views |

- परराज्यातील ठेकेदाराने काम घेतले 9 टक्के बिलो ने
- परजिल्ह्यातील ठेकेदाराने तेच काम घेतले 12 टक्के बिलो ने
- परजिल्ह्यातील ठेकेदाराने तेच काम दिले 18 टक्के बिलो ने
- निवडणुक काळात आमदार दौलत दरोडा यांनी दिला होता शब्द
- शहापूर-मुरबाड तालुका जोडणाऱ्या शाई नदीवरील पुलाची डागडुजी पुर्ण! 

शहापूर : शहापूर-मुरबाड-म्हसा या रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईमुळे शहापूर व मुरबाड तालुक्यातील जनता हैराण झालेली असताना, संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा चे अधिकारी तर चक्क korantain च झाल्याचे चित्र निर्माण झालेले आहे . या रस्त्याच्या कामाच्या दिरंगाई बाबत आता आणखीन एक धक्कादायक गोष्ट बाहेर येत आहे . परराज्यातील एका खाजगी कंपनीला मिळालेले हे रस्त्याचे कंत्राट हे तब्बल 9 टक्के बिलो असल्याने त्याची भर काढण्यासाठी जाणूनबुजून हे रस्त्याचे काम विविध कारणे सांगून अपूर्ण ठेवत शासनाचे दरवर्षी येणारे dsr ( शासकीय बांधकाम दर ) रेट वाढल्यानंतर वेळेची मुदत वाढवून ही भर काढण्याचे षडयंत्र संबंधित कंपनी , ठेकेदार व महामंडळाचे काही अधिकारी चालवत असल्याचा संशय शहापूर तालुक्यतून सामान्य ठेकेदार व्यक्त करीत आहे.
 
murbad_1  H x W
 
शहापूर - मुरबाड - कर्जत - खोपोली या राज्य महामार्गाचे काम मागील तीन वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आले . यामध्ये शहापूर - मुरबाड - म्हसा या कामांसाठी दोन विभागात निविदा मागवण्यात आल्या होत्या . यामध्ये पाहिले शहापूर तालुक्यातील कामाचे काळू नदीवरील पुलाचे बांधकाम धरून अंदाजे 114 कोटींची निविदा तर दुसरे मुरबाड तालुक्यातील म्हसापर्यंतचे काम हे 110 कोटींचे होते . या कामाच्या निविदा परराज्यातील हैद्राबाद येथील एका कंपनीने तब्बल 9 ते सव्वा नऊ टक्के बिलो ने भरीत हे काम मंजूर करून घेतले . या कंपनीकडून पालघर जिल्ह्यातील एका ठेकेदाराने अधिकचे 3 टक्के बिलो ने हे काम आपल्याकडे घेत स्वतः करणार असल्याच्या गमजा मारीत शहापूर तालुक्यातील लहान - मोठे ठेकेदारांना काम मिळवून न देता स्वतः समाजसेवेचा टेंभा मिरवीत शहापुर तालुक्यात समाजसेवेचा पूर आणला . मात्र कालांतराने हे काम पालघरच्या या समाजसेवक कम ठेकेदाराने आंध्रप्रदेश येथील ठेकेदाराला मोठ्या फरकाने (18 टक्के) दिल्याची चर्चा सुरू होती ,मात्र या आंध्रप्रदेश च्या ठेकेदाराने काही कोटींचे काम पूर्ण करीत यात काहीही फायदा नसल्याने व त्याची आर्थिक फसवणूक झाल्याने हे काम त्याने सोडून पलायन केले.
 
पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील समाजसेवक कम ठेकेदार पुढे आला . शहापूर ते काळू नदीपुढील काही किलोमीटर अंतर सर्वच खोदून ठेवत शहापूर व मुरबाड तालुक्याला जोडणार काळू नदीचा पूल देखील स्फोटकांच्या साहाय्याने विनापरवानगी उडवत या 25 ते 28 किमी रस्त्यावरील हजारो ग्रामस्थांना मागील तीन वर्षांपासून धूळ , चिखल खायला लावत असल्याने तालुक्यातील जनता या समाजसेवकावर संताप व्यक्त करीत आहेत .
 
या अर्धवट रस्त्याच्या कामांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे . जखमी झालेल्या व्यक्तींना काही हजारांची रक्कम हॉस्पिटल उपचारासाठी करत आपण खूप काही येथील ग्रामस्थांसाठी करित असल्याचा आव सोशल मीडियावर आणीत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून याच रस्त्यावर मोठी दुर्घटना जर का काही घडली तर येथे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
 
शहापूर माझाकडून जाहीर आवाहन
शहापूर ते खुंटघर या गावापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घरे यांचा प्रश्न अंधारात असल्याने या ठिकाणी काम करता येत नसल्याचे ठेकेदार व त्यांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी सोशल मीडियावर सांगत आहेत , मात्र खुंटघर च्या पुढे संपूर्णच रस्ता , मोऱ्या , लहान पूल हे खोदून ठेवलेले असल्याने येथे अपघाताची मालिका सुरूच असते . शहापूर ते खुंटघर या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीबाबत जरी प्रश्न असला तरी जो आहे तो रस्ता जर का उत्तमरीत्या बनवून किंवा डांबरीकरण केले तरी तालुक्यातील हजारो ग्रामस्थांची गैरसोय टाळणार आहे .
 
शहापूर माझाच्या माध्यमातून आम्ही या सामाजिक कार्यकर्ता कम ठेकेदाराला आवाहन करतो की जो पैसा अपघात झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील जनतेला देत असता किंवा आमच्या तालुक्यातील आदिवासी जनतेच्या जमिनी ( विशेष म्हणजे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या स्मार्ट सिटीत जाणाऱ्या ) पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या नावावर घेत आहेत ते बंद करून प्रथम तालुक्यातील जनतेसाठी महत्वाचा असलेला हा रस्ता तयार करून आपली सामाजिक बांधिलकी दाखवा आम्ही शहापुर माझातर्फे त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू .