वसईमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

जनदूत टिम    14-Jun-2020
Total Views |
वसई . कोरोना विशाष्णूच्या पार्श्वभूमीवर वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी १३ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . भारत रत्न राजीव गांधी ब्लड बँक तर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात ३० रक्तदात्यानी रक्तदान केले .
 
Blood Camp_1  H
 
या शिबिराला वसई सचिन मेंडिस , विजय मच्याडो , Adv जिम्मी घोंसलविस या सर्व लोकानीं शिबिरास भेट दिली . राज्यात रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदान करणे व शिबिर घेणे गरजेचे झाले होते , गरजूंना वेळेत व पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे या साठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जिल्हा स्तरावर रक्तदान करण्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकारीकार्यांना आहावन केले होते . प्रत्येकाला टोकन पध्दतीने वेगळी वेळ देउन गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली , त्यानुसार २८ मार्च पासून वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसनी रक्तदान करण्याची मोहीम सुरू केली. आज वसई विरार जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे तिसऱ्यांदा रक्तदान शिबीर बोळीज ख्रिश्चन आळी विरार वेस्ट येथे आयोजित करण्यात आले होते. 
 
या शिबिराला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , या प्रमाणेच समाजातील इतर नागरिकांनी रक्तदानासाठी समोर येउन सामाजिक कार्यात सहभाग नोंदविण्याची गरज आहे . यामुळे गरजूंना वेळेवर रक्त मिळण्यास मदत होईल . वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी सर्व रक्तदात्याचे आभार मानले . हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिन मेंडीस,विजय मच्याडो, क्रिस्टल नाडर,फेलिक्स पांगे, ऑल्ड्रिन तुस्कानो,महिंद्र रॉड्रीग्स, रुडॉल्फ रॉड्रीग्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.