गणरायाच्या साक्षीने दिलेला शब्द आमदार दौलत दरोडा साहेबांनी अखेर पाळला

जनदूत टिम    14-Jun-2020
Total Views |

- आमदार दरोडा साहेबांच्या २५ / १५ ग्रामविकास निधीतून परटोलीकरांसाठी १० लक्ष रुपयांचा समाज हॉल मंजूर

शहापूर : गेली दिड वर्षांपूर्वी पावसाळी गणेशोत्सवाच्या वेळी शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दौलत दरोडा साहेबांच्या निवस्थानी असलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी कु.गणेश धोंडू चौधरी व कु.पंढरीनाथ धर्मा ढमके गेले असता यावेळी आमदार दौलत दरोडा साहेबांना परटोली गावातील समाज मंदिराचे काम सुचविले होते यावेळी आमदार साहेबांनी गणरायाच्या साक्षीने शब्द दिला होता की लवकरच समाज मंजूर करून दिलं जाईल.
 
Daroda_1  H x W
 
शहापूर विधानसभेचे दरोडा साहेब पुन्हा एकदा आमदार होताच साहेबांनी विकास कामांवर जोर दिला आणि २५ /१२ ग्रामविकास निधीतून परटोली करांसाठी १० लक्ष रुपयांच समाज हॉल मंजूर करून देऊन परटोली करांना दिलेला शब्द पाळला. आमदार दौलत दरोडा साहेब किन्हवली दौऱ्यावर असतांना साहेबांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परटोली येथे बांधण्यात येणाऱ्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच मंदिरात बसून गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन हितगुज साधले यावेळी परटोली गावाच्या सार्वांगीण विकासासाठी गणेश चौधरी यांनी गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले व विकासापासून दूर असलेले अनेक प्रश्न यावेळी आमदार दरोडा साहेबांच्या समोर मांडले यावेळी आमदार साहेबांनी सकारात्मक चर्चा करत लवकरच तुमच्या उर्वरित विकासकामे केली जातील असे आश्वासन दिले.
 
परटोलीकरांठी समाज हॉल मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मठाधिपती धरमनाथ बाबा यांच्या शुभहस्ते आमदार दौलत दरोडा साहेबांना शाळ श्रीफळ देऊन आभार मान्यता आले. तसेच समाज हॉल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उद्योजक राजेश गोपीनाथ फर्डे, नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे, आमदार साहेबांचे स्वीय साहाय्यक प्रशांत सुरेश भोईर, कु.गणेश धोंडू चौधरी व कु.पंढरीनाथ ढमके यांचे सुद्धा ग्रामस्थांनी कौतुक केले व आभार मानले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक धर्मा हरी ढमके, रामचंद्र हरी ढमके, कृष्णा पालो ढमके, संजय घुडे, व सुनील किसन ढमके, राजेश सासे, प्रदिप ढमके, गितेश ढमके, प्रकाश रघुनाथ ढमके उपस्थित होते.