कलेक्टर पदाच्या प्रमोशनच्या नादात,ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांचे दुर्लक्ष !

किरण निचिते    14-Jun-2020
Total Views |
ठाणे : मुबई जवळच्या ठाणे जिल्ह्यात सेवा करायाला येण्यापूर्वी कोकण आयुक्त कार्यालयात महसूल विभागाच्या फायलींवर निकाल देऊन करोडो रुपयांचा मलिदा लाटून ठाणे जिल्ह्णात मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर चार्ज घेतल्यापासून कोणतेही ठोस काम न करणाऱ्या सोनावणे यांनी शिक्षणासारख्या महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयात लक्ष घालून एक आदर्श निर्माण करण्याची गरज असतांना तसे काहीही न करता भ्रष्ट नव्हे तर भ्रष्टाचाराचा कळस केलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आपला कलेक्टर होण्याच्या नादात जिल्ह्याचे वाटोळे करण्याचा षडयंत्र रचत आहे.

ZP Thane_1  H x
 
सध्या सध्या प्रकरणांत निर्णय न घेणारे व्यक्तिमत्व सोनावणे यांनी भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या तीन वर्षांपासून उप अभियंता म्हणून प्रभारी पदावर काम करणाऱ्या गीते यांच्या बाबत अनेक तक्रारी करूनही कोणताही निर्णय घेतला नाही. असे इतर विभागाचे तर अनेक विषय धूळखात पडून आहेत.
शिक्षण विभागाच्या शेकडो नाही तर हजारो विषय जे आहेत त्यांना या सी ओ महाशयांनी हात घातलेला नाही. कामाचा पगार घ्रेतात कि पोट भरण्यासाठी काम करतात असे शिक्षण विभागात चर्चिले जात आहे. जानेवारी महिण्यात लाच घेतांना पकडलेल्या वरिष्ठ सहाय्यक साळवे या कर्मचाऱ्यावर अजूनही दोषारोप पत्र दाखल न करण्याची सजा सोनावणे यांना व्ह्नायलाच पाहिजे. पुन्हा गंमत बघा त्याच लाचखोर कर्मचाऱ्यांकडे ज्या विभागाचा शाळा डिजिटल करण्याचा चार्ज होता त्याच विभागात या लाचखोराने २ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शिक्षण अधिकाऱ्यांच्या संगनमताने केला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. सदर आरोपाची कोकण आयुक्त यांच्याकडे चौकशी सुरु आहे. गंमत बघा सदर लाचखोर अधिकाऱ्याचे मुख्यालय मुरबाड पंचायत समिती असून हा ठाणे जिल्हा परिषदेत रोज येऊन ह्या भानगडी सेट करीत असतो.

Hiralal Sonawane_1 &
 
ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागमध्ये. कनिष्ठ लेखाधिकारी हि २ पदे असून एकाला नियुक्तीपासून अद्याप कारभारच दिलेला नाही. जे पाकीट वसुलीचे काम करतात त्यांनाच चार्ज देऊन ठेवला आहे. तसेच एक वरिष्ठ सहाय्यक आहेत ते शिक्षण विभागात बदलीपासून आले तेव्हापासून कार्यभाराचं दिलेला नाही. याला अंदाजे साधारण झाले असतील दीड वर्ष म्हणजे सी ओ शिक्षण विभागाचे काम पाहताच नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे. त्याच बरोबर एक वरिष्ठ सहाय्य्क आहेत त्यांनाहि सहा महिन्यापासून काम दिलेले नाही त्यामुळे या काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हिरालाल सोनावणे यांच्या पगारातून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात नोकरी करून १२ ते १४ वर्ष सेवा झाली तरी अनेक कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रमोशन देण्यात जिल्हा परिषद प्रशासन हलगर्जी केल्यामुळे शासनाने कालबद्ध पदोन्नती मिळावी यासाठी सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढूनही येथील कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. संपूर्ण ठाणे जिल्हापरिषद शिक्षण विभागातील लोकांचा मागील अनेक महिन्याचा पगार कधीही वेळेवर झालेला नाही.
अनेक विषय फाईल आज पडून असूनही कलेक्टर व्हायला निघालेले सोनावणे दोन तास कार्यालयात येऊन ठाणे जिल्ह्यासाठी कोणते योगदान देणार नसल्याने या भ्रष्टाचाराला साथ देणाऱ्या सी ओ ना आता ठाणे जिल्ह्यातून बदली करावी अशी मागणी केली जात आहे.