बंजारा समाजाचे नेते मा. हिरालाल राठोड यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी द्यावी - युवाध्यक्ष प्रभू चव्हाण

जनदूत टिम    09-May-2020
Total Views |
मुंबई : बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी भरीव कामगिरी करणारे समाज नेते मा. हिरालाल राठोड यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात यावी अशी संपूर्ण राज्यातुन मागणी आता जोर धरू लागली आहे. विधानपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापनेच्या पूर्वी पासून ते मा.पवार साहेबां सोबत कार्य करीत आहेत.
 
Hiralal Rathod_1 &nb
 
राठोड यांची बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असलेली तळमळ पाहून मा.पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस बंजारा सेलचे राज्य प्रमुख हे पद दिले. या पदाचा सदुपयोग करत त्यांनी राज्यातील प्रत्येक तांडे, वाडी - वस्ती, तालुका व जिल्ह्यामध्ये उत्कृष्टरित्या कार्य पाडले. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेत मा.पवार साहेबांनी त्यानां राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती- जमाती सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. या पदाच्या कार्यकाळात राठोड यांनी संघटनात्मक काम करत राज्यभरातील हरएक तांडा वस्ती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पोहचवत बंजारा समाजाला न्याय मिळवून दिला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, जयंतराव पाटील, छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे या सर्वांच्या सहकार्याने परभणी कृषी विद्यापीठ नामांतरण आणि तांडा वस्ती योजना व भटक्या विमुक्तांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून दिला आहे. शासनाच्या विविध योजनांचा समाजघटकांना ही लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे समाज नेते हिरालाल राठोड यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करत बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे राज्यातील बंजारा समाजाच्या वतीने नवी मुंबईतील बंजारा समाजाचे युवाध्यक्ष प्रभू चव्हाण व संजय चव्हाण यांनी केली आहे.
 
हिरालाल राठोड यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीमुळे तळागाळातील जनमानसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करतील अशी भावना प्रभू चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.