अशी असेल दारू विक्रीची टोकन पद्धती

जनदूत टिम    05-May-2020
Total Views |
मद्यविक्री दुकानासमोर ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात यावं. त्यामध्ये किमान ६ फुटाचं अंतर असावं.
मद्य विक्री सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना मार्किंगमध्ये उभं राहण्याच्या सूचना द्याव्यात.
 
Liqor_1  H x W:
 
रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा, ज्यामध्ये ग्राहकांचा नंबर, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि मद्याच्या मागणीचा माहिती (ब्रँडचं नाव व किती मागणी) असावी.
 
ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा.
 
अशा पद्धतीनं एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येईल. त्यानंतर दुसऱ्या तासात ५१ ते १०० असे क्रमांक घेण्यात यावे. अशा प्रकारे ८ तासात ४०० लोकांना मद्य विक्री केली जाऊ शकते. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगावं. यामुळे गर्दी नियंत्रित करता येईल.
 
हे सर्व करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं काटेकोटरपणे पालन करण्यात यावं. यासाठी मद्य विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. त्याचबरोबर राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टसिंग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असं विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आलं आहे.
 
गर्दी होणाऱ्या विशिष्ट भागातील पाहणीसाठी भरारी पथक नेमण्यात यावं. त्याचबरोबर उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनीही मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिले आहेत.