मला कोरोना झाला तर

किरण निचिते    04-May-2020
Total Views |

Kiran Nichite_1 &nbs
 
मला कोरोना झाला तर?
मी फेसबुक live बोलेन
मी सर्व जगाला सांगेन
मी सेवा देताना मला ससंर्ग झाला
मला प्रवासात कोणीतरी भेटले
मला लागण झाली तोही प्रवासी
मी दोष कुणाला देणार नाही
मला व्हायरस कुणाला द्यायचा नाही
मला कोरोना झाला तर?
मला जगाला सांगता येईल
मला भेटलेले काळजी घेतील
मला बोलावणारे तपासून घेतील
मला कोरोना झाला तर?
समाज सजग होईल
मित्र - सोयरे बिनधास्त राहतील
मान खाली घालणार नाहीत
मला कोरोना झाला तर
गाव साफ होईल
शेजारी सुध्दा नियम पाळतील
ग्रामपंचायती सेवेत येतील
मला कोरोना झाला तर
याची नको आता लाज
उपचार करतील जिगरबाज
सगळ्यांमध्ये जागृती व्हावी
मला कोरोना झाला तर
तो जाहीर व्हावा
त्याला उघड करावे
नावानिशी जगाला सांगावे
 

Corona poem_1