जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

जनदूत टिम    03-May-2020
Total Views |

Jilha Bank_1  H
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याकडे पीपीई किट सुपूर्द करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील. 
 
पालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून या आरोग्य यंत्रणेला मदत म्हणून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आ. हितेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मदतीचा हात दिला असून त्यांच्या तर्फे कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, आशा वर्कर यांना १०० पीपीई किट पालघर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले . पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात पीपीई किट डॉक्टर, नर्स, यांना वाटप करण्यात आले .
 
यावेळी ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, काँग्रेसचे वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. स्वप्नील शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण पाटील, सदानंद पाटील, माजी बांधकाम सभापती पांडुरंग पाटील,आदींसह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.