आयुक्त शेखर गायकवाडांचे वजन घटले; मुठे, डॉ. वावरेही उतरले

जनदूत टिम    21-May-2020
Total Views |
पुणे : पुण्यावर झडप घातलेल्या कोरोना संकटाशी दोन हात करीत त्याला परतवून लावण्याचा इरादा केलेले पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांचे शारीरिक वजन पाच किलोनी घटले. गेल्या दीड महिन्यांत गायकवाड यांचे वजन ७३ वरून ६८ किलोपर्यंत उरतले आहे.
 
gaykwad_1  H x
 
या मोहिमेत प्रचंड धावपळ होऊनही अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्वत:ला जपले तरीही त्यांचे वजन दोन किलो कमी झाले आहे. नेहमीच आपला 'फिटेनस' फंडा जपणारे उपायुक्त राजेंद्र मुठेही उतरले असून, त्यांचे वजन आठ किलोंनी कमी झाले आहे. शिडशिडीत बांध्याचे डॉ. संजीव वावरे हेही सहा किलोंनी कमी झाले आहेत. आयुक्तपदाची जबाबदारी येऊन दीड महिना होताच गायकवाडांना कोरोनाशी दोन हात करावे लागले. याआधी रोजच्या खाण्यापिण्याची प्रचंड काळजी घेणाऱ्या गायकवाडांचे या काळात 'ब्रेक फास्ट'पासून लंच, डीनर आणि अगदी झोपेचेही टायमिंग चकले आणि त्याचा परिणाम शरीरावर झाला.
 
याआधी त्यांचे वजन ७२.८ किलो होते; ते कमी होऊन आता ६८ किलो झाले आहे. गडबडीत त्यांचे वजन किती कमी झाले असावे? हा प्रश्न त्यांना पाहणाऱ्या हमखास पड़तो. तो प्रश्न विचारला आणि गायकवाड म्हणाले, मी साडेचार-पाच किलोंनी कमी झालोय,' गायकवाडांपाठोपाठ रोज किमान १५ ते १६ तास ऑफिस आणि कंटेन्मेंट झोनपासून हॉस्पिटल, रुग्णांसाठी नवे उपाय, विलगीकरण कक्ष, त्याच्या तयारीच्या पाहणीत रोज चार-पाच तास घालविणाऱ्या रुबल अग्रवाल यांचे वजनही दोन किलोनी घटले आहे.. सलग सव्वादोन महिने एकही सुट्टी न घेतलेले आणि रुग्ण, संशयित वाढण्याच्या शक्यतेने त्यांच्यासाठी उपायांची जबाबदारी असलेल्या मुठेचा मॉर्निंग वॉक, स्विमिंग आणि सुट्टीच्या दिवशी हिंडण्याभर असतो.
 
त्यातून ते अधिकच 'मेटेंन आहेत, पण आता त्यांचे वजन ७७ वरून ७० पर्यंत घटले आहे. डॉ. वावरे प्रत्यक्षात डोळ्यापुढे आले की वाटते यांचे वजन किमान पंधरा किलो कमी झाले असावे? इतका ताण असलेल्या डॉ. वावरेंचे वजन ६६ होते आता ६० असल्याचे त्यांनी सांगितले.पुण्यात कोरोनाने धकड मारली असली त्याआधी पंधरा दिवसांपासून महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती.
 
कोरोनाचे आक्रमण रोखण्याच्या हेतून आयुक्त गायकवाड यांच्यासह अग्रवाल आणि त्यांची सारी टीम उपाय आखत होती आणि ते अमलात आणायची तयारी करीत होते. तेवढ्यात नऊ मार्चनंतर आतापर्यंत कोरोनाने पावणेचार हजार पुणेकरांना आपल्या आवाक्यात घेतले. आकडे वाढत चालल्याने यंत्रणा हबकली आणि पुणेकरांच्या बचावासाठी यशस्वीरित्या पावले टाकू लागली. या लढाईत गायकवाड यांच्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांच्या अगदी सापताहिक सुट्याही रद्द झाल्या. त्यामुळे गेली अडीच-पावणेतीन महिने ही मंडळी रोज सलग १६ ते १८ तास झटत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या रुटीनवर होत असल्याचे दिसून आले आहे.