विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे घरवापसीचा मार्ग मोकळा

जनदूत टिम    01-May-2020
Total Views |
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्शवभूमीवर परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांच्याकडे केली होती.
 
ST _1  H x W: 0
 
तसेच आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर याना केंद्र शासनास पत्र द्यावयास सांगितले होते. वडेट्टीवार यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केल्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थयांचा स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्याच्या प्रवासाला परवानगी देऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.यामुळे परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार आहेत. देशात अचानक लागू केलेल्या लॉकडाउननमुळे उच्च शिक्षणासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा,दिल्ली, पुणे, मुंबई यांसह राज्यातील इतर जिल्ह्यात गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना तात्काळ स्वगृही आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी विनंतीपर मागणी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्य सचिव अजय मेहता, प्रधान सचिव डॉ नितीन करीर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना पत्राच्या माध्यमातून केली होती.
 
सर्व विद्यार्थ्यांना संचारबंदीमुळे अनेक ठिकाणी एकट्यानेच राहावे लागत आहे.परराज्यात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात स्पष्ट केले.या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित मागणीचा पाठपुरवठा करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर स्वगृही आणावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लक्ष वेधण्यात आले. विद्यर्थ्यानप्रमाणेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा,दिल्ली, पुणे, मुंबई यांसह राज्यातील इतर जिल्ह्यात महाराष्ट्रातील मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी तिथे वास्तव्य करीत आहेत.लॉकडाउनमुळे ही मुले गेल्या दोन महिन्यापासून तेथेच अडकून पडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून परराज्यात शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्रात पुन्हा कसे येतील याबाबत शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंतीवडेट्टीवार यांनी पत्राच्या माध्यमातून केली होती.