अंत्योदय, प्राध्यान कुटुंब लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वितरण

जनदूत टिम    07-Apr-2020
Total Views |
सोलापूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण ११ एप्रिल नंतर केले जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी आज सांगितले. पाटील यांनी सांगितले की, अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. यासाठीचे धान्य १० एप्रिल पर्यंत जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे. हे धान्य आल्यानंतर ११ एप्रिल पासून वितरणास सुरवात केली जाईल. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील नियमित धान्य घेण्या-या लाभार्थ्यांना हे धान्य मिळेल.
 
सध्या एप्रिल महिन्याचे धान्य वितरण सुरु आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्थ धान्य दुकानात गर्दी न करता आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन घ्यावे, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले आहे.