मुलांची बौद्धीक क्षमता वाढवायचीय?, हे मोबाइल गेम्स खेळू द्या

जनदूत टिम    06-Apr-2020
Total Views |
जग झपाट्याने डिजिटल होत आहे. त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता, विचार करण्याची क्षमता, फोकस करण्याची क्षमता कमी होताना दिसत आहे. इंटरनेटवर सर्च केल्यास सर्व मिळत असल्याने मुलांची बौद्धिक क्षमता कमी होत आहे. जर छोट्या मुलांना मनोरंजन देण्याबरोबरच त्याची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल किंवा त्याचा आयक्यू लेवल वाढवायचा असेल तर सध्या मोबाइलवर काही गेम्स आहेत. या गेम्सच्या मदतीने मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत मिळू शकते, Skillz, Lumosity, Tricky Test, Logic Master, Brain Games, Math Puzzle हे सर्व मोबाइल गेम्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. अनेक पालक मुलांना मोबाइल गेम्स खेळू देतात. जर गेम खेळू द्यायची असतील तर मग मुलांची बौद्धीक क्षमता वाढवणारी गेम्स का देऊ नयेत? या गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच आणखी नवीन काही तरी शिकता येईल...
 
Child_1  H x W:
 
या यादीत पहिला गेम Skillz आहे. हा ब्रेन गेम म्हणून ओळखला जातो. तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, याची परीक्षा घेतो. या गेममध्ये तुम्हाला विचार करायला आणि निर्णय घेण्यात तुम्ही किती तरबेज आहात याची चाचणी घेतो. या गेममध्ये रंगाची ओळख करण्यात येते. परंतु, यासाठी खूप कमी दिला जातो. तसेच यात कोडे सुद्धा असते. तसेच अनेक प्रश्न विचारले जातात. जे अनेकदा तुमची दिशाभूल करू शकतात. हा गेम अॅपल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे.
 
गुगल प्ले स्टोरवर हा लॉजिक मास्टरचे दोन व्हर्जन उपलब्ध आहेत. Logic Master १ आणि Logic Master 2 असे या दोन गेमचे नाव आहेत. WeezBeez डेवलपरचा हा गेम मस्त आहे. या गेमचे ग्राफिक्स सोपे आहेत. यात एक केवळ एका बोटाने ड्रॅग आणि ड्रॉप करावे लागते. यात २०० हून अधिक कोडे उपलब्ध असल्याचा डेवलवरचा दावा आहे. हा गेम सोपा असल्याने तो मुलांना फार आवडतो. छोट्या मुलांना खेळण्यासाठी हा गेम सोपा आहे.
 
गेमच्या यादीत विजबीच डेवलपरचा हा आणखी एक गेम आहे. फाईंड माय माईंड या नावावर बराच अंदाज बांधता येवू शकतो. हा गेम एक प्रकारे युनिक प्रमाणे आहे. ज्यात १८ कोड्यासह ३६०० हून अधिक लेवल आहेत. या गेमचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सोपे ग्राफिक्स आणि सहज कंट्रोल करता येण्यासारखे आहे. हा गेम खेळताना ९ प्रकारे काम करतो. स्मरणशक्ती, लॉजिक, फोकस, स्पीड आणि रिअॅक्टवर काम करण्याची क्षमतेची चाचणी होते, असा कंपनीचा दावा आहे.
 
जगभरात १०० मिलियन म्हणजेच १० कोटी हून अधिक लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे. या गेमला जगभरात खूप मोठी मागणी आहे. शाळेत जे मुलं हुशार समजले जातात. त्या मुलांमध्ये हा गेम मोठ्या प्रमाणात खेळला जातो. हा अॅप सायन्सवर आधारित आहे. यामुळे तुमची स्मरणशक्ती, फोकस, समस्यांचे समाधान कसे करावे याची क्षमतेची चाचणी करतात. यात तुम्हाला १० मिनिटांची फ्री चाचणी देवू शकतात. म्हणजेच तुमच्या वयाच्या व्यक्तीची तुलना करता येवू शकते.
 
या गेमच्या नावावरून कळते की, ट्रिकी टेस्ट गेम बुद्धीला चालणा देणारा असेल. या गेममध्ये तुमच्या बौद्धिक क्षमता तासण्यासाठी तुम्हाला चुकीचे कोडे खेळावे लागतात. ही परीक्षा कठीण असते. तुमच्या आयक्यूची तपासणी केली जाते. जर १११ प्रश्नांचे उत्तर तुम्ही १२० मिनिटात सोडले तर तुम्ही एक प्रतिभासंपन्न आयक्यू असलेली व्यक्ती असू शकतात, असा कंपनीचा दावा आहे. गुगल प्ले स्टोरवर Tricky Test 1 आणि Tricky Test 2 गेम उपलब्ध आहेत. हे दोन्ही गेम खेळण्यासाठी मजेदार आहेत.
 
मॅथ पझल म्हणजेच गणीत कोडे. हा गेम नावावरून माहिती पडतो की, यात ज्या व्यक्तींना गणिताची आवड असेल त्या व्यक्तींसाठी हा गेम बनवण्यात आला आहे. जर तुमच्या मुलांनाही गणिताची आवड असेल त्याला कोडे सोडवणे चांगेल वाटत असेल तर त्यासाठी हा गेम मस्तच आहे. जर एखाद्या मुलाला गणित विषय आवडत नसेल किंवा अवघड जात असेल तर तो विषय आवडू लागण्यास या गेमची मदत होऊ शकते, असा डेवलपर्सचा दावा आहे. या गेममध्ये गणिता विषयीचे प्रश्न विचारले जातात. तसेच लॉजिकल विषयांना अनुसरून प्रश्न कोडे विचारले जातात.
 
या गेममध्ये मुलांच्या निर्णय क्षमतेवर, क्विक रिस्पॉन्सची परीक्षा घेतली जाते. Left vs Right मध्ये एकूण ५० गेम्स आहेत. जे मुलांच्या बौद्धीक क्षमतेची ६ गटात विभागणी करते. या गेममध्ये एक कलरब्लाइंड मोड सुद्धा आहे. जे कलर ब्लाइंड मुलांसाठी बनवण्यात आला आहे. या गेममध्ये अनेक कोडे असे आहेत जे तुमचे डोके बऱ्यापैकी खावू शकतात. एका - एका प्रश्नांचे उत्तर देताना तुम्हाला दहा-दहा वेळा विचार करावा लागणार, असे कठीण कोडे यात असतात.