निर्मळ मनाचा दानशूर राजा बाळा दादा पवार

जनदूत टिम    04-Apr-2020
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यातील किन्हवली शहरातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख असणारे सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेलं नामवंत व्यक्तिमत्त्व आदरणीय बाळा दादा पवार म्हणजे गोरगरिबांचा आधारस्तंभ, निस्वार्थी भावनेने अनेकांना मदतीचा हात देऊन गावोगावी उभारल्या जाणाऱ्या देवीदेवतांच्या मंदिरांना सढळ हाताने मदत करणारा दानशूर राजा माणूस म्हणजे बाळा दादा.
 
Bala dada_1  H
 
राजकारणातील अनेक नेते मंडळींशी कौंटुंबिक सबंध असतांना, अनेकांना सढळ हाताने मदत केली असतांना नव्हे तर श्रीमंतीचा गर्व न बाळगता स्वतःच्या गरिबीची जाण ठेवत सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणे जनसामान्यांत वावरणारा आणि प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणारा निर्मळ मनाचा बाळा दादा. आज जगभरात कोरोनो सारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातलं असतांना अनेकांचे उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले आहेत. आर्थिक मंदीचे सावट असतांना सुद्धा आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने किन्हवलीतील एकमेव नामवंत यशस्वी दानशूर व्यक्तिमत्त्व उद्योजक बाळा दादा पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २ लक्ष रुपयांचा धनादेश व ५०.००० रुपयांचे किराणा सामान म्हणजेच एकूण २.५ लक्ष रुपयांचा भरीव निधी आज शहापूरच्या तहसीलदार सौ.निलिमा सूर्यवंशी मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याप्रसंगी समवेत दै.सकाळ चे पत्रकार शाम काका पतंगराव, सामाजिक कार्यकर्ते बाळू मामा विशे, भगवान दादा निमसे व इतर सहकारी उपस्थित होते.
 
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक नव्हे तर इतर विविध क्षेत्रात शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसर हा नेहमीच अग्रेसर असून मदतीसाठी नेहमीच पुढे असतो, उद्योजक बाळा दादा पवार हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शहापूर तालुक्यातील सर्वात जास्त मदत करणारे पहिले दानशूर व्यक्तिमत्त्व ठरले असून समस्त शहापूर करांच्या वतीने तसेच सोशल मीडियावर त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. बाळा दादा आपणांस दिर्घ आयुष्य लाभो आणि समाजाच्या सेवेसाठी आपली समाजसेवेची ज्योत अशीच कायम तेवत राहो आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना व पुढील यशस्वी वाटचालीसाठी आनंदमय शुभेच्छा.