डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे केंद्र व राज्य शासनाला मदत

जनदूत टिम    04-Apr-2020
Total Views |
अलिबाग : करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला मदत म्हणून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सर्वश्री. उमेशदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी करिता १६ लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-१९ करिता १६ लाख रुपये आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड करिता ५ लाख रुपये असे एकूण ३७ लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केले.

nana Dharmadhikari_1  
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही
केले आहे.