संचारबंदीच्या काळात सुधन बेदाणा रिसीट तारण व सोनेतारण कर्ज पंढरपूर अर्बन बॅकेकडून उपलब्ध:- आ. प्रशांत परिचारक

जनदूत टिम    28-Apr-2020
Total Views |
सोलापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग व देशामध्ये असणारी संचारबंदीची परिस्थिती या पार्श्वभुमीवर नागरिकांना आर्थिक अडचणी येवु नये म्हणून पंढरपूर अर्बन बँकेने सोनेतारण कर्ज ब सुधन बेदाणा रिसीट तारण कर्ज योजना सुरू केली असल्याची माहिती पंढरपूर अर्बन बॅकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
 
Prashant Paricharak_1&nbs
 
 
याप्रसंगी बोलताना बॅकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, देशामध्ये कोरोना रोगाचा फेलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी संपुर्ण देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रातही कोरोना आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. संचारबंदी असल्याने छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी यांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून निर्माण झालेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकरी बांधवांची ही अडचण ओळखुन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुधन बेदाणा रिसीट तारण कर्ज योजना व व्यापारी व शेतकऱ्यांसाठी सोनेतारण कर्ज योजना या लॉकडाऊन कालावधीमध्ये आमचे बँकेने चालू ठेवली आहे.
 
याप्रसंगी बोलताना बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे म्हणाले की, बॅकेचे कुटुंबप्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक व बॅकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनातून सुधन बेदाणा रिसीट तारण कर्ज योजना ही बँकेची शाखा-टाकळी रोड, पंढरपूर येथे ब सोनेतारण कर्ज योजना शाखा- नवीपेठ, महिला, प्रदक्षिणा, मार्केट यार्ड-पंढरपूर येथे चालू असून कार्यालयीन वेळेत तात्काळ सेवा देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. तसेच अर्बन बँकेच्या चारही शाखेत २४ तास एटीएम सेवा उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा. या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास बँकेचे वरिष्ठ अधिकारी राजेश आगावणे-९८५०६८१३६५, कनिष्ठ अधिकारी संदीप पिटके- ९६३७८६१००१ यांच्याशी संपर्क साधुन सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन याप्रसंगी केले.
 
याप्रसंगी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन पंढरपूर अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी, बॅकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारीवंद यांनी केले.