रेड झोन'चे निकष तालुकानिहाय करावेत : पुष्पलता पाटील

जनदूत टिम    27-Apr-2020
Total Views |
अमळनेर : शहरासह तालुक्यात गंभीर स्थिती आहे. तालुक्यात ११ रुग्ण कोरोनाबधित असून, सुमारे १०१ जण क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने निकष बदल करून रेड झोन तालुकानिहाय जाहीर करावेत अशी मागणी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केली आहे.
 
Pushpalata Patil_1 &
 
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे, की शहर नागरी क्षेत्रात आपल्या शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनेनुसार अमळनेर पालिका प्रशासनाने अथक परिश्रम घेवून, मोठ्या प्रमाणात सर्व माध्यमांद्वारे प्रचार व प्रसिध्दी केली. ८ मार्च २०२० जागतिक महिला दिनाचे नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्याचे नियोजन रद्द व्हावे असे पत्र ६ मार्चलाच काढले होते. २२ मार्च २०२० जनता कफ्र्यु व २४ मार्च २०२० ते ३ मे २०२० लॉकडाउन घोषीत हावून जनतेने या उपक्रमास उत्स्फूर्त साथ दिली.
 
मात्र, लॉकडाउन, सोशल डिस्टन्सींग बाबतच्या नियमांची पायमल्ली करून बाहेरुन येणाऱ्या नातेवाईक, आप्तेष्टांमुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या १० वर पोहचली आहे. त्यापैकि २ बाधीत मृत्यु पावले आहेत. जिल्ह्यात कोरोना संशयीतांची संख्याही २४ असून १०१ नागरीक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. महसूल, गृह, आरोग्य आणि पालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी गेल्या एक महिन्यापासून रात्रंदिवस मेहनत घेत असूनही फक्त ५ टक्के जनतेच्या असहकार्यामुळे व आडमुठेपणामुळे कोरोना विषाणूच्या संकटामध्ये अनपेक्षीत वाढ होत असल्याने जनता व प्रशासनही हादरले आहे.
 
अमळनेर शहरासह तालुक्यातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर मात व नियंत्रण मिळविण्यासाठी १५ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्याठिकाणी संख्या वाढत आहे तो रेड झोन अशा जिल्हानिहाय निकषा ऐवजी तालुकानिहाय निकष लावावेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत तो भाग तालुकानिहाय रेड झोन ग्राह्य धरावा. सुधारीत दिशा निर्देश नागरी हित सुरक्षितततेस्तव असे जाहीर करावे. यासह अमळनेर शहरासह तालुका रेडझोन जाहीर करावा, अशी मागणीही नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केली आहे.