कोरोनामुळे अमली पदार्थांना वाढती मागणी

जनदूत टिम    27-Apr-2020
Total Views |
मुंबई : कोरोना महामारीने देशाचेच नव्हे तर जगाचे आर्थिक चक्र बिघडलं असलं तरी माञ अमली पदार्थाच्या विक्रीच्या माध्यमातून काही लोकांच्या आर्थिक हातभार लागल्याचे चित्र दिसत आहे .
 
Drugs_1  H x W:
 
मद्य , तंबाखू , तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा,चैनीखैनी आदी) यासारखे चैनीच्या वस्तूंच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून सुमारे चारशे ते पाचशे पट भाव वाढ झालेली आहे . यामुळे उद्योग बंद असले तरी अशा विक्रेत्याला भरपूर आर्थिक मोबदला मिळत असल्याने हे विक्रेते कोरोनाचे उपकार या जन्मीतरी फेडू शकणार नाहीत . सर्व सामान्य जनता कोरोनामुळे अडचणीचा सामना करीत असतांना चैन करणाऱ्या महभागांना घरादाराच्या चिंतेचे नाही तर या चैनीच्या वस्तूं मिळवण्यासाठी जिवाचा आटापाटा करण्याची चिंता भेडसावत असते. पाच रुपयाची गुटखापुडी सत्तर ते ऐंशी रुपये तर शंभर सव्वाशे रुपयाला मिळणारी मद्याची बाटली पाचशे ते सहाशे रुपयाला विक्री होत असल्याचे बोलले जात आहे . लाॕकडावूनच्या या कालावधीत प्रामुख्याने या वस्तू उपलब्ध कशा होतात हा सुद्धा मोठा प्रश्न आहेच . कोरोनाने जग दुःखाने वेढले असले तरी या पदार्थाच्या विक्रेत्याला सुगीचे दिवस आलेत हे मात्र नक्की .