अंडी गर्भावस्थेत खाणे कितपत योग्य आहे?

जनदूत टिम    27-Apr-2020
Total Views |
अंडी खाण्याआधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात अंड्यांचे सेवन गर्भवती स्त्रिसाठी पुरक ठरते. संतुलित आणि पोषक आहारामध्ये अंड्यांचे देखील विशेष महत्व आहे आणि खास करून गर्भवती महिलांना सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
eggs_1  H x W:
 
त्यामुळे गर्भवती महिलांनी हे जाणून घेतलं पाहिजे की कोणत्या पदार्थातून आणि किती प्रमाणात त्यांच्या शरीराला आवश्यक घटक मिळू शकतात. आता ब-याच लोकांचे मत असते की, अंडी ही गरम असल्यामुळे गरोदरपणात (during pregnancy) त्याचे सेवन केल्यास शरीरास हानी पोहचू शकते. तर अशावेळी मनात नको ते संभ्रम निर्माण करून घाबरण्यापेक्षा हे वाचा आणि जाणून घ्या, गर्भावस्थेत अंडी खाल्ल्याने काय होतात फायदे आणि नुकसान!
 
अंडी खाण्याचे परिणाम आणि अंड खाण्याची पद्धत
अंड्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे म्हजेच प्रथिने आणि खनिजे आढळून येतात. त्यामुळे गर्भावस्थेत तंदरूस्त राहण्यासाठी महिलांनी अंडी खाणे गरजेचे आहे, पण अर्थातच अंडी खाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार आवश्यक आहे. तर गर्भवती महिला अंड खाऊ शकतात पण त्यांनी पूर्णपणे शिजलेलं अंडंच खाणे गरजेचे आहे. अर्धवट शिजलेल्या किंवा भाजलेल्या अंड्यामध्ये अनेक प्रकारचे जसे की साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया असतात ज्यांच्यामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते. पूर्णपणे शिजलेल्या अंड्यातून बॅक्टेरियासोबतच साल्मोनेला देखील निघून जातो आणि विषबाधा होण्याची संभावना टळते. त्यामुळे कधीही गर्भवतींच्या आहारामध्ये शिजवलेल्या अंड्याचाच समावेश करावा.
 
गर्भावस्थेत अंडी खाण्याचे फायदे
पेशींच्या निर्मितीसाठी आणि बाळाच्या विकासासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात अंड खाल्ल्याने तुम्हाला त्याचे चांगले परिणाम नक्की दिसून येतील. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणारा कोलाइनचा घटक गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकास करण्यात मदत करतो आणि यामुळे बाळाला न्यूरल ट्यूब डिफेक्‍ट यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
 
कॅलरीज वाढवून कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते
गर्भावस्थे दरम्यान महिलांना २०० ते ३०० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे एका सामान्य आकाराच्या अंड्यामध्ये जवळ जवळ ७० कैलरीज असते ज्यामुळे गर्भावस्थेत असणा-या महिलेची आणि गर्भातील बाळाची गरज पूर्ण करू शकते. रोज अंड खालल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते. तसेच तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलशी संबधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने रोजचे डायट ठरवणे गरजेचे आहे.
 
किती अंडी खाऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम काय?
गर्भावस्थेतील स्त्रियांनी रोज किती अंडी खावीत हे शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर अवलंबून असते. जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी बरोबर असेल तर तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ अंडी आरामात खाऊ शकता. कच्च्या आणि अर्धवट शिजलेल्या अंड्यामध्ये साल्मोनेला सारखे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियामुळे अन्नातून विषबाधा होऊन उलटी, जुलाब, खूप प्रमाणात ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि डिहायड्रेशन होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे इतकी गंभीर असू शकतात की त्यामुळे नवव्या महिन्याआधीच बाळंतपण होऊ शकतो किंवा गर्भपातही होऊ शकतो.
 
इतर दुष्परिणाम आणि डायटमध्ये सामील करण्याची पद्धत
गर्भवती महिलेमध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाण आधीपासूनच जास्त असेल तर अंडयामुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळे अंड्यामुळे त्वचेवर पुरळ येणं किंवा पित्त होणं यासारखे त्रास होऊ शकतात. अंडी किमान पाच ते सात मिनिटे शिजवून मगच खा. अंड भाजताना त्यातील सफेद भाग पूर्णत: फ्राय होईल याची काळजी घ्या. तसेच साध्या अंड्यामध्ये तुम्ही मसाले किंवा भाज्या टाकून देखील खाऊ शकता. यामुळे त्याची चव देखील चांगली लागू शकते.