निरोगी आरोग्यासाठी उन्हाळ्यात या ५ भाज्या नक्की खा

जनदूत टिम    24-Apr-2020
Total Views |
आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास मेंदूसह आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहते. प्राणघातक आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचे असेल तर नियमित भाज्यांचे सेवन करणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तरच तुमचे शरीर आजारांचा सामना करू शकते. उन्हाळ्याच्या वाढत्या दाहामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल तापाच्या त्रासासोबत घसादुखी, डोकेदुखी आणि पोटदुखीसारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. कारण थंड पाणी तसंच पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढते. ऋतूबदलानुसार आहाराच्या सवयींमध्येही बदल करणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये या पाच भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्यास भरपूर प्रमाणात लाभ मिळतील.
 
​पडवळ (Snake Gourd)

Padval_1  H x W 
 
- पडवळमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वे आहेत. मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी पडवळ ही भाजी अतिशय प्रभावी आहे.
- या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. विशेष म्हणजे यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. यामध्ये खनिजांचा साठा आहे. पडवळमध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे पोषकतत्त्व आहेत. महत्त्वाचे म्हणजे पडवळ हे पचनास अतिशय हलके आहे.
 
​कमळ काकडी (Lotus Root)

Kamal Kakadi_1   
 
- कमळ काकडीच्या सेवनामुळे मेंदू शांत राहण्यास मदत मिळते. यातील पोषणतत्त्वांमुळे पचन प्रक्रिया सुधारते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कार्य कमळ काकडी करते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यानं पोट रिकामे असल्याचे जाणवत नाही. यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरी जात नाहीत. यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते.
- कमळ काकडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
- वाढलेले वजन कमी करण्यासाठी कमळ काकडीचे सेवन करणे हा रामबाण उपाय आहे. यातील फायबरमुळे चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे पचन प्रक्रियेचे कार्य सुधारते.
 
​दुधी भोपळा

Dudhi Bhoapla_1 &nbs 
 
- जर तुम्हाला परफेक्ट फिगर किंवा स्लिम राहायचे असेल तर आहारामध्ये दुधी भोपळ्याचाचा समावेश करा.
- तुम्हाला भोपळ्याची चव पसंत नसेलही कदाचित, पण यामुळे मिळणाऱ्या शारीरिक फायद्यांसाठी आहारामध्ये दुधीचा समावेश करण्यास हरकत नाही.
- दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. यातील पोषकघटक शरीराचे गरम हवेमुळे होणारे नुकसान रोखते. दुधी भोपळ्याच्या सेवनामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरावर उष्णतेचे दुष्परिणाम होत नाहीत. दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, लोह, झिंक आणि पोटॅशियम हे घटक आहेत.
 
घोसाळे खाण्याचे फायदे (Zucchini)
 
Ghosale_1  H x
 
- घोसाळे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. घोसाळ्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
- घोसाळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि पोटॅशियमचे घटक मुबलक प्रमाणात आहेत. हे सर्व घटक आपल्या त्वचा, हाडांसाठीही पोषक आहेत. ज्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराचं नुकसान कमी होण्यापासून मदत मिळते. ही भाजी पचायला हलकी आहे.
- यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील जास्त नाही.
 
​टिंडा (Indian Gourd Apple)

Tinda_1  H x W: 
 
-टिंड्यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाण्याचे प्रमाण असते. टिंड्याची भाजी पित्तशामक, शीत गुणाची आहे. यामध्ये फायबर देखील आहेत. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही टिंड्याचे सेवन केलं तर शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.
- पाणी आणि फायबरयुक्त टिंड्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होत नाहीत. यातील पोषणतत्त्वे मूत्र संसर्ग होण्यापासून आपला बचाव करतात.