शेई ग्रामपंचायती कडुन जंतू नाशक औषधची फावरणी व जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आले ..!!

जनदूत टिम    02-Apr-2020
Total Views |

Shai Grampanchayat_1  
शहापूर : कोरोना संसर्ग आणि प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेई ग्रामपंचती तर्फे रोगजंतूनाशक फवारणीचे व जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप करण्यात आले तसेच विषाणूनाशक औषध फवारणी करण्यात आली असून अंतर्गत रस्त्यांवर आणि गटारींवर फवारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
 
संपूर्ण शहरातील फवारणीला प्रारंभ झाला असून शेई ग्रामपंचायत कार्यालय व कातकरी वाडी येतून सुरू झाली.याप्रसंगी ग्रामपंचत माजी सरपंच चिंतामण वाघे ,सरपंच गोपाळ मुकणे ,उपसरपंच जितेंद्र तारमळे,पोलीस पाटील योगीश्री तारमले व सद्यस्य शंकर तारमळे ,विजय तारमळे व ग्रामसेवक शेलवले भाऊसाहेब तसेच ग्रामस्थ प्रकाश तारमळे, दीपक तारमळे उपस्थित होते.