ब्राह्मण सभेकडून माणगांव मधील गरजूंची घरपोच भोजन व्यवस्था

जनदूत टिम    02-Apr-2020
Total Views |
बोरघर / माणगांव : संपूर्ण जगभरातील देशात आणि भारतात महामारीचे तांडव माजवून सर्वत्र हाहाकार माजवणार्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे.
 
Mangaon_1  H x
 
लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात संपूर्ण देशातील सर्व नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे कामधंदा, नोकरी, रोजीरोटी मिळवण्यासाठी आपल्या घरापासून, गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून आणि राज्यापासून व देशापासून दूर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी आणि त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिथे आहेत तिथेच त्या त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या साठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन त्यांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेत आहे.
देशावर आलेल्या या राष्ट्रीय आपत्तीचा सर्वार्थाने सामना करण्यासाठी आपल्या सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मानवतावादी जबाबदारीची जाणीव ठेवून सरकारला या आपत्तीच्या काळात आपापल्या परीने सर्वोतोपरी मदत करण्यासाठी देशातील राष्ट्रप्रेमी छोटे मोठे उद्योजक, चित्रपट सृष्टीतील सिने कलाकार, आमदार,खासदार, मंत्री, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक आणि धार्मिक संघटना आर्थिक व इतर स्वरूपाची सर्व मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील ब्राह्मण सभा माणगांव या सामाजिक / धार्मिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण लाॅकडाऊन कालावधीत अर्थात १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण माणगांव तालुक्यातील गरजू गोरगरीब लोकांच्या घरपोच भोजनाची जबाबदारी घेतली असून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील खरवली तलाठी सजाचे तलाठी श्री. अमित उजगरे यांच्या कार्यक्षेत्रातील खरवली येथील पन्नास गरजूंना मोफत भोजनदान देण्यात आले. तसेच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील व माणगांव शहरातील अनेक गरजूंच्या मोफत घरपोच भोजनाची व्यवस्था केली जात आहे. सदर सामाजिक संघटनेचे शेखर गोडबोले भ्रमणध्वनी ८८०५५५५६७८, प्रसाद खरे भ्रमणध्वनी ९०४९२२६३२६, मनिष खरे भ्रमणध्वनी ८०८७४४२१०९, आशिष जोशी भ्रमणध्वनी ८९९९१९९७०१, देवेंद्र घैसास भ्रमणध्वनी ८०८०८८००९२ यांनी माणगांव तालुक्यातील गरजू लोकांना आवाहन केले आहे की, यांच्या वरील भ्रमणध्वनीवर माणगांव तालुक्यातील गरजू लोकांनी आपले नाव व पत्ता आणि किती व्यकींचे जेवण लागेल हे एक दिवस आधी सांगितले की त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी घरपोच मोफत भोजनाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा.
 
गरजू लोकांनी कोणीही घरी उपाशी पोटी राहू नये. व कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये. शासनाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण कोरोना व्हायरसच्या विरोधातील ही लढाई जिंकून कोरोना व्हायरसचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करू शकतो अन्यथा नाही. माणगांव तालुक्यातील सर्व सामाजिक, धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी माणगांव तालुक्यातील गरीब गरजू लोकांना आणि या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी पुढे येऊन गरीब गरजू लोकांना सहकार्य करावे.