किराणावाला: एक उपेक्षित देवदूत

अल्पेश पाटील    16-Apr-2020
Total Views |
एका नवीन विषाणूने (कोविद-१९) संपूर्ण जगाला आपल्या मर्यादांची नव्याने जाणीव करून दिली आणि त्याचप्रमाणे प्रत्येक देशांचे सरकार, नेतेमंडळी आणि प्रशासक यांना त्यांची बुद्धी आणि कार्यक्षमता यांचा परिपूर्ण लोककल्याणासाठी वापर करावयास प्रवृत्त केले. आपल्या भारतासारख्या विराट लोकसंख्या असलेल्या देश्यात हे काम अधिकच जोखमीच आणि जिकरीच झालं आहे.
 
kiranaa_1  H x
 
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्यांच्या त्यांच्या घरात स्वेच्छेने बंद करून ठेवणे जवळ जवळ अशक्यच, पण प्रत्येक राज्यांची प्रशाषण आणि पोलीस यंत्रणांची प्रशंसा करावी तितकी कमीच. आपण रोजच पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांचे त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे समाजकल्याणासाठी होत असलेले बलिदान, स्वतःच्या आरोग्याची आणि प्राणांची पर्वा न करता आपल्या समाजासाठी करत असलेले कार्य तारीफ करण्यासारखच आहे. पण यांच्या बरोबर एक अविरत सामाज्याची सेवा करणारा, लोकांना त्यांच्या जीवनावश्य वस्तू त्यांच्या शेजारीच उपलब्ध करून त्यांना या संकटकाळी सुरक्षित ठेवणारा व बाहेर पडणाऱ्या लोकांची गर्दी कमी करून पोलीस व प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करणारा आपला बाजूचा, गल्लीतला किंव्हा गावातला किराणावाला म्हणजे या संकट काळातला एक उपेक्षित देवदूतच म्हणावा लागेल.
 
सरकार आणि स्थानिक प्रशासनाने लोकांना आपापल्या घरात बंद करून घेण्याचा विनंती वजा आदेश त केलाच पण जगण्यासाठी उपयुक्त असलेले भाजीपाला, दूध आणि किराणा त्यांच्यापर्यंत कसा पोचणार, यासाठी नेहमी भावासाठी घासाघीसिला सामोरे जाणारे हे विक्रेते यावेळी मात्र अत्यावश्यक सेवेत दाखल झाले आणि यापुढे सुरु होतो या आणखी एका देवदूताचा प्रवास.
 
अमेरिकेत मोफत खानावळी बाहेर लागलेली रांग
युरोपात संचारबंदी सुरु झाल्यानंतर सर्वात मोठी समस्या निर्माण झाली ती मोठ्या मोठ्या शोप्पिंग मॉल समोरच्या लागलेल्या त्या पेक्षा ही मोठ्या रांगा आणि काही तास तिथेच ताटकळत राहणे कारण आपल्या इथे गल्ली गल्लीत आणि गावागावात असणारी छोटी मोठी दुकानं तिथे नाहीत. म्हणून काही देशांनी वर्गवारी सुरु केली म्हणजे काही तास फक्त वरिष्ठ नागरिक, काही काल मेडिकल वर्कर्स आणि नंतर इतर, अगदी कालच बघितलेल्या एका बातमीत हजारोंच्या संख्येने अमेरिकन लोक अन्नाच्या शोधात सार्वजनिक खानावळ जी या काळात तेथील सरकारने सुरु केलेली आहे, जेथे शंभरेक लोकांची जेवणाची सोय केली जाते आणि शोप्पिंग मॉल्सच्या समोर रांगा लावून उभे असतात आणि हाती काहीच लागत नाही. पण आपल्या देशात मात्र एवढी मोठी लोकसंख्या असूनही अशी परिस्तिथी उद्भवली नाही याचे कारण आपला शेजारचा किराणावाला. काही तज्ञांचा मते भारतात प्रत्येक दीडशे ते दोनशे लोकांमागे एक किराणा दुकानं आहे. सध्या सर्व लहान मोठ्या शहरात शोप्पिंग मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोर्स आल्यामुळे या किरण्यावाल्याकडे आपण पाठ फिरवली होती. मात्र कोरोना विषाणूचा फैलावामुळे संपूर्ण संचारबंदी लागू झाल्यावर हाच किराणावाला प्रेमळ हास्याने आपलं स्वागत करून आपल्याला काय हवंय ते पुरवू लागला. पण हे पुरवणे आपल्याला वाटते तितके सोपे नव्हते.
 
कालपरवाच एका बातमीत वाचलं कि वस्तूंचा तुटवडा निर्माण करून जास्त किमती घेणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. पण कारवाई नक्की गुन्हेगारावार होती कि एखाद्या देवादुतावर, कारण प्रत्येक वेळी अश्या परिस्थिती चा फायदा घेणारे आणि कारवाई ला सामोरे जाणारे वेगळेच. किरकोळ विक्रेता ठेऊन ठेऊन किती माल ठेवणार लहान विक्रेता १०-१५ किलो आणि मोठा अशेल तर १००-२०० किलो हअ माल संपला कि तो वितरकाकडे मागणार, वितरक संपला म्हणून सांगेल आणि दोन तीन दिवसांनी मागणी वाढल्यावर १० ते २० टक्के वाढवून किरकोळ विक्रेत्याला देणार, आणि दोष अधिक रोष येणार किरकोळ विक्रेत्यावर कारण ग्राहकाला सामोरा जाणारा हाच. आज या किरानेवाल्याला देवदूत म्हणणेच उचित राहील कारण आपण आपल्या घरात सुरक्षित असताना हा जोखीम पत्करून प्रसंगी विताराकापर्यंत जावून आपल्याला अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी रस्त्यावरील पोलिसांच्या नाकाबंदीला, प्रसंगी कायद्याच्या औपचारिकतेला सामोरे जावून आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. विविध प्रकारच्या अनेक ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना धान्य देउन त्यांच्याकडून पैसे हाताने घेतो. ही देवघेव पण या संसर्ग काळात धोकाच नाही का? भारत हा ग्रामीण देश देश समजला जातो कारण भारतात आज पण साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात राहतात आणि या ग्रामीण भागात कोणताही वितरक थेट आपला माल पुरवठा कातर नाही. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, तालुक्याची ठिकाण किव्हा मोठी बाजारपेठ ह्या या वितरकांच्या कक्षा.
 
पण या पलीकडेही भारताची मोठी लोकसंख्या छोट्या छोट्या खेड्या-पाड्यात राहते आणि या अश्या छोट्या छोट्या गावात ही आजच्या परिस्थितीत हे छोटे छोटे कीरानावले तुटपुंज्या कमाईवर सेवा देण्याचे काम करतात तेही सर्व माल स्वतः शेजारील मोठ्या बाजरातून आपल्या दुकानापर्यंत स्वखर्चाने आणून(वितरकाला (distributor) किरकोळ विक्रेत्यापर्यंत माल पोचवणे बंधनकारक असते.) ग्राहकाला त्याच किमतीत पोहोचवतो. यासाठीच या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपण घरात कन्टाळा एईपर्यन्त राहत असताना,कोणी आपल्या राहिलेल्या इच्छा आणि छंद जोपासत असताना काही लोक दिवसरात्र काम करत आहेत. काही आपल्याला दिसतात, काही दाखवले जातात पण हा आपल्यासाठी झटणारा,प्रसंगी जोखीम पत्करणारा किराणावाला उपेक्षित देवदूतच म्हणावा लागेल.
 
अशा अनेक देवदूतांचा (किराणावाला) अनुभव घेऊन हा लेख तयार करण्यात आला आहे.  एका आदिवासी भागातील लेखकाने ही सत्यस्थिती समोर आणली आहे. 
 - अल्पेश पाटील