प्रसारमाध्यमांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या

जनदूत टिम    15-Apr-2020
Total Views |
संयुक्त राष्ट्र : कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून खोटी माहिती जगातल्या कानाकोपऱ्यात अतिशय वेगाने पोहोचली. त्यात अगदी विषाणूच्या उत्पत्तीपासून ते उपचारापर्यंतची चुकीची माहिती मिळाली नसेल असा जगातला कुठलाच भाग उरला नाही.
 
press_1  H x W:
 
अशा पद्धतीने पसरणाऱ्या खोट्या बातम्यांच्या आजारापासून समाजस्वास्थ्य बिघडत असल्याने प्रसारमाध्यमांचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे प्रसारमाध्यमांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी युनेस्कोचे सर्व देशांपुढे केली आहे.
कोरोनाच्या थैमान काळात अफवा व चुकीच्या माहितीला रोखण्यासाठी कोणत्याही कठीण प्रसंगी चोख कामगिरी बजावणाऱ्या प्रसारमाध्यमांना सर्व देशांनी अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन युनेस्कोने केले आहे. कोरोनाच्या संकटासंदर्भात जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात खोट्या माहिती वेगाने पोहोचली. कोरोनाच्या उद्रेकापासून ते सरकारी उपाययोजनांबाबत व्यापक पातळीवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये भीतीचे वाताव
निर्माण करणाऱ्या माहितीचा प्रसार वेगाने होत आहे. काही तज्ज्ञ मंडळी याकडे 'माहितीची महामारी' म्हणून पाहत आहेत, असे
युनेस्कोच्या संवाद आणि माहितीसंबंधीच्या धोरणांचे पसरणाऱ्या चुकीच्या माहितीला थोपविण्यासाठी सर्व देशांनी प्रसारमाध्यमांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला पाहिजे. स्वतंत्र पत्रकारितेच्या आवश्यक भूमिकेला फटका बसेल, असे पाऊल कोणत्याही देशांनी उचलू नये.
 
उलट कोणत्याही काळात सत्तेतील नागरिकांच्या मनाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पत्रकारितेची ताकद ओळखून त्यांना
पाठिंबा द्यावा, असे आवाहन बर्जर यांनी केले. सध्याची स्थिती पाहता खरी माहिती नागरिकांपर्यंत जाणे अतिशय आवश्यक आहे. सरकारने अधिकाधिक पारदर्शीपणे माहिती नागरिकांसमोर ठेवली पाहिजे, असेही बर्जर म्हणाले. अफवा रोखण्यासाठी सरकारांनीदेखील अधिक पारदर्शक असले पाहिजे. तसेच माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि धोरणानुसार स्वतःहून अधिकाधिक अचूक माहिती नागरिकांसमोर ठेवली पाहिजे, असे मत युनेस्कोने व्यक्त केले.