कोरोना युद्धातील घडामोडी

जनदूत टिम    13-Apr-2020
Total Views |
दि. ५ एप्रिल २०२० : राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची नोंद, यामुळे रुग्णसंख्या ७४८, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, राज्यात १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती .
 
modi_1  H x W:
 
इस्त्राईलहून दिल्लीला परतलेल्या पण लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडलेल्या मुलुंड येथील श्रीमती एलिझाबेथ पिंगळे यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दूरध्वनीद्वारे संपर्क आणि सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे व्यवस्था करण्याचे संबंधितांना निर्देश. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणमार्फत खबरदारी, टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा विशेष प्रसिध्दीपत्रकाराद्वारे प्रशासनाचा इशारा, स्वस्त धान्य दुकानांमधून वितरण सुरळीत, किराणा दुकानांचा अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समावेश, ही दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश. अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ लाखांचे योगदान. कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही दोन मोठी आव्हानक असून सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास. पंडिता रमाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन. महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा; घरातच पूजा, प्रार्थना करण्याचे आवाहन. कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा. देशात सर्वत्र लॉकडाऊन आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना २ एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून काही व्यक्ती निलंगा येथे पोहोचल्या. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली,या घटनेची, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यामार्फत गंभीर दखल, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चोवीस तास सुरु असणारा नियंत्रण कक्ष सुरू झाल्याची, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती. नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३, व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ व ई-मेल [email protected] राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत २४ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अवैध मद्याबाबत १,३५७ गुन्ह्यांची नोंद, ३९ वाहने जप्त, ५१४ आरोपींना अटक, ३ कोटी ३४ लाख ८४ हजाराहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. • मुंबई शहर जिल्हा नौदलाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

udhhav_1  H x W 
 
दि.६. एप्रिल, २०२० : • राज्यात कोरोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या- ८६८, कोरोनाबाधित ७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, मृत्यूंची संख्या ५२ झाल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा. • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन. कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी केल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. कोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा, राज्यातील काम समाधानकारक; परंतु प्रसार थांबविण्यासाठी अधिक जागरूकतेची गरज असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन, नागरिकांसाठी हेल्पलाईन कार्यरत ठेवण्याची सूचना. कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार, विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती गठित, विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या सूचना. मुंबई विद्यापीठाकडून ऑनलाईन समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवेला सुरूवात. राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप, ३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती. जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची टंचाई नाही, किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणेची खबरदारी, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते, याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची, अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरू, १३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा माहिती. जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-१९ निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याद्वारे जाहीर, (१) मुंबई महानगर महापालिकेकरिता - प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई. (२) ठाणे जिल्ह्याकरिता - रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - पॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई (३)पालघर जिल्ह्याकरिता - उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई, (४) सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळाबै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे (५) पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे, (६) अहमदनगर जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळाआई फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे, (७) कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली, (८) सोलापूर, लातूर, उस्मानाबाद - या जिल्ह्याकरिता -
प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर, (९) धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, (१०) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद,(११)अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर,(१२) नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर. कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे येण्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन. भगवान महावीर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा. आपले वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची,राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची घोषणा.

Rajesh Tope_1   
 
दि.७ एप्रिल, २०२० : मंत्रिमंडळ निर्णय • शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देणार. कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने विविध उपाययोजना, अधिसूचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता. १३ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्यात साथरोग कायदा १८९७ लागू, उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १३ मार्च रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन, १४ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अधिसूचना लागू,त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम निर्धारित, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये समाविष्ट, गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना जाहीर, आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, पॅरावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहीत करणे. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे. कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.
 
एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत मान्यता, संबंधितांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळणार. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना पत्र, संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे मंत्रिपरिषदेची बैठक,चर्चेतील ठळक मुद्दे- कोरोना : सद्य:स्थिती - महाराष्ट्रात आजमितीस ८६८ रुग्ण, ५२ मृत्यू, मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ५.९९ इतका. मरण पावलेल्या ११ रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती,एकूण १७५६३ नमुन्यांची तपासणी, १५८०८ नमुने निगेटिव्ह. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात.मुंबईमध्ये सर्वाधिक ५२५ रुग्ण, ३४ मृत्यू, पुणे येथे १३१ रुग्ण व ५ मृत्यू, ठाणे विभागात ८२ रुग्ण व ५ मृत्यू आहेत, महाराष्ट्रात ११ कोटी १९ लाख ६६ हजार ६३७ लोकसंख्येपैकी ८६८ कोरोनाचे रुग्ण आढळले, प्रत्येक १० हजार लोकसंख्येमागे ०.०७७ असे रुग्ण, आढळलेल्या रुग्णांमध्ये ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३९.७५ टक्के पुरुष आणि १३.२५ टक्के महिला. दहाव्या आठवड्यात भारतात ४१२५ रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत १ लाख २२ हजार ६५३, फ्रान्समध्ये ३७ हजार १४५, जपानमध्ये १ हजार ६९३ आणि चीनमध्ये ८१ हजार ६०१ अशी आकडेवारी. • सध्या राज्यात ३ लाख २ हजार ७९५ एन-९५ मास्क, ४१ हजार ४०० पीपीई, १० हजार ३१७ आयसोलेशन बेड, २ हजार ६६६ आयसीयू बेड आणि १ हजार ३१७ व्हेंटिलेटर्स उपलब्ध.
दि.७. एप्रिल, २०२० : • धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट, क्वारंटाईन सुविधा, कोरोना उपचार विशेष रुग्णालयाची पाहणी. कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा, बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा, अशा मंत्रीमहोदयांच्या सूचना. लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे, खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध ११३ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबरची कार्यवाही जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक सामान, औषधे, सॅनिटायझर, मास्क इ. बाजारात उपलब्ध होतील. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही व मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल. लॉकडाऊनच्या कालावधीत थेलेसेमिया रुग्ण व कर्करुग्णांना रक्ताचा तुटवडा होणार नसल्याची, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ग्वाही. जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी दि. २५ मार्चपासून २४x७ तास कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष तयार, टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदविण्याची व्यवस्था. नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक, सर्व महसूल विभागातील किराणा व औषध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू व औषधांची उपलब्दता, कुठेही अन्नधान्य, फळभाजीपाला आणि औषधांचा तुटवडा नसल्याचे, शासनाकडून स्पष्ट. वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची १८३ वाहनातून आवक, पुण्यात १० हजार क्विंटल भाजीपाला व कांद्याची आवक, नागपूरच्या कळमणा मार्केटमध्ये १८५ ट्रक/टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक. अवैध मद्यविक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची शालेय शिक्षण विभागातील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम' म्हणजेच घरातूनच अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हनुमान जयंतीनिमित्त आणि शब्ब-ए-बारातासाठी शुभेच्छा,आपापल्या घरातच थांबण्याचे आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून, जागतिक आरोग्यदिनानिमित्त जनतेला शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी विष्णू ल. पाटील आणि सहकारी संस्थाचे सहनिबंधक मोहम्मद आरिफ यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी - कोविड-१९, साठी प्रत्येकी ५१ हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द, कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पुण्यातील इंडो शॉट ले, या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांच्यामार्फत १ कोटी रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द. लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांच्या वतिने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यामार्फत सुपूर्द. समाजमाध्यमांद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी संवाद, ठळक मुद्दे- कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता [email protected] या ई मेल वर नोंदवावे, सर्दी, पडसे आणि तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे पुढील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयात रवानगी, सौम्य लक्षणे, तीव लक्षणे आणि तीव्र लक्षणांबरोबर इतर तक्रारी आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था, तीव्र लक्षणे, गंभीर आजार व इतर तक्रारी असणाऱ्या रुग्णांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल, ही रुग्णालये हृदयविकार, किडणी, मधुमेह यासारख्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज, किमान आधारभूत किंमतीवर मध्यमवर्गीयांना धान्य उपलब्ध करून देण्याची प्रधानमंत्र्यांकडे मागणी, शिवभोजन योजनेची क्षमता एक लाखापर्यंत वाढवली असून यात आणखी वाढ करण्याची तयारी, स्थलांतरीतांच्या कॅम्पमध्ये साडेपाच ते सहा लाख लोकांची व्यवस्था, स्वत:चा मास्क इतरांना देऊ नका.
 
दि. ८ एप्रिल २०२० : राज्यात २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदुळाचे वाटप सुरू असल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. • कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राणी संग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घेण्याच्या वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे असल्याने 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'ने पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली असल्याची, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. हाफकीनकडून प्रमाणित पीपीई किट, एन ९५ मास्क विक्रीला परवानगी, अप्रमाणित पीपीई किट व एन ९५ मास्कचे, उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी अधिसूचना जारी. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाय योजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना (https://mahainfocorona.in/en/home) संकेतस्थळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड १९ च्या खात्याचा क्यूआर कोड संकेतस्थळावर उपलब्ध. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू, एका दिवसात १७९ गुन्ह्यांची नोंद; ६० आरोपींना अटक बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 'लर्न फ्रॉम होम' म्हणजेच घरूनच अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी या अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना, २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोशिएशन' च्यावतीने (आयएमए) 'रक्षक' क्लिनिक सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक सुरू करण्याचे आश्वासन 'आयएमए'च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचे स्पष्ट. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याद्वारे, खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोविड-१९ ची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी, रिपोर्ट नेगेटिव्ह. मुंबई व पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयात मास्क घालणे बंधनकारक करण्याचा शासनाचा निर्णय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करणाऱ्यांविरुद्ध १३२ गुन्हे दाखल,समाज माध्यमांवरील गैरप्रकारांवर महाराष्ट्र सायबरचे लक्ष राज्यात कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या ११३५, कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, सध्या ९४२ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले, ११३५ जण पॉझिटिव्ह आले, सध्या ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. सोशल डिस्टन्सींग पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले, त्यामुळे जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे असे, जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे येण्याचे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन.
 
दि.९ एप्रिल २०२० : मंत्रिमंडळ निर्णय कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नसल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करणार. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमणार, पहिली समिती आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश, दुसरी समिती मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्व जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचा समावेश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात एप्रिल २०२० पासून एप्रिल २०२१ पर्यंत ३० टक्के वेतन कपात.
• १ मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार, कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही. कोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे, याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांच्या सूचना, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणार. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटींची मदत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते पे ऑर्डर उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु, दि. १ ते ८ एप्रिल २०२० या आठ दिवसात राज्यातील १,००,४०,८२२ शिधापत्रिका धारकांना २५,८१,५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. • गुडफ्रायडेला घरीच प्रार्थना आणि स्मरण करुन भगवान येणूंची शिकवण आचरणात आणण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध सातत्याने छापेसत्र सुरु; १६ दिवसात १ हजार ९६५ गुन्ह्यांची नोंद तर ४ कोटी ६९ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त. • मॅको बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता COVID-१९ या निधीस रुपये ५ लाख तकी मदत देण्याचा निर्णय. • मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जंतुकीकरणासाठी ड्रोनचा वापर, लॉकडाऊन अधिक प्रभाव करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. • करोना बाधित १२५ रुग्ण बरे होऊन घरी, दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्णसंख्या १३६४ असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
 
दि. १० एप्रिल २०२० : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील २६ ‘कोविड-१९' रुग्णांपैकी २४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन. आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत. खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निर्देशानुसार पालिकेची मार्गदर्शक तत्वे जारी. रुग्णालयात काम करणाऱ्या व प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगारांना पीपीई किट, एन ९५ मास्क, ग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावा. २) रुग्णालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घ्या.३) रुग्णालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करा. ३) रुग्णालयात काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, कामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकरीता वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करा. नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्या, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणिकरण गतिने करा. रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करुन त्यासाठी आवश्यक किटस् उपलब्ध करून द्या, अशी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी. राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे सुरळीत वितरण, दि. १ ते १० एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील १ कोटी ९ लाख २९ हजार ६९४ शिधापत्रिकाधारकांना २८ लाख, ७२ हजार २८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी ; एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक. व्हाट्सअॅप वापरताना घ्यावयाची दक्षता- चुकीच्या/ खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नका. ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती ग्रुपवर पाठविली तर ती पुढे कोणालाही पाठवू नका. आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी/चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडिओज, मेमो किंवा पोस्ट्स येत असतील की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल ग्रुप अॅडमिनला सांगून नजिकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करा, माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या./ ग्रुप अॅडमिन, ग्रुप निर्माते (creator) असाल तर काय करावे?- ग्रुप स्थापन करताना प्रत्येक सदस्य (member ) हा जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करा. ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगा. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा. परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin असे करा. कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आल्याची, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा. कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत होणारी चौकशी (Inquest) न करण्याची पोलिसांना मुभा.
 
दि. ११ एप्रिल २०२० : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत, हेल्पलाइन क्रमांक- १८००२२४९५० (नि:शुल्क) किंवा १९६७, राज्यस्तरीय हेल्पलाइन सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार, अन्य हेल्पलाईन क्रमांक : ०२२- २३७२०५८२ / २३७२२९७० / २३७२२४८३, ईमेल- [email protected], ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या संकेतस्थळाचा वापर करा, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु, हा कक्ष सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार, त्याचा हेल्पलाईन क्रमांक- ०२२-२२८५२८१४, ईमेल- [email protected] क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन, महात्मा फुले यांच्या ध्यासातील महाराष्ट्र घडवण्याचे ठाकरे यांचे आवाहन. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ईस्टर निमित्त नागरिकांना शुभेच्छा. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर कारवाई सुरू, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी नाही, त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे विभागाचे आवाहन, २४ मार्च ते १० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कालावधीमध्ये २ हजार २८१ गुन्ह्यांची नोंद, ८९२ जणांना अटक, १०७ वाहने जप्त, ५५ कोटी रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप आणि अन्नछत्र सुरू, या अन्नधान्य वितरण व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना (ओएमएसएस) योजना लागू करण्यात येत असल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टोरेंट समूहातर्फे ५ कोटी रुपयांचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद, या बैठकीची माहिती व घेतलेले निर्णय सांगण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे समाजमाध्यमांद्वारे जनतेला संबोधन, प्रमुख मुद्दे- महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार,परिस्थिती नियंत्रणात असली तरी गाफील राहू नका, लॉकडाऊनच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, औषधे यांची वाहतूक आणि पुरवठा सुरु राहणार, धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्त आपल्या सभोवतालच्या शृखंला तोडणार, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जावे लागले तरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा, घरातील जेष्ठांची काळजी घ्या, आतापर्यंत ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी मुंबईत १९ हजार चाचण्या, १ हजार पॉझेटिव्ह रुग्ण आढळले, बाधित रुग्णांमध्ये ६५ ते ७० टक्के लोकांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे. मुंबईमध्ये ज्या भागात पॉझेटिव्ह रुग्ण आढळले ते विभाग पूर्ण सील.