श्री पांडुरंग सह.कारखाना सॅनिटायझर निर्मितीतही अग्रेसर

जनदूत टिम    01-Apr-2020
Total Views |
सोलापूर: माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला सॅनिटायझर बनवण्याची परवानगी मिळाली असून या सनि टाॅयझरला सुपंत हॅन्ड सॅनीटायझर हे नाव देण्यात आले आहे. या सॅनिटायझरची २ ते ३ दिवसांमध्ये सर्वत्र विक्री सुरू होणार असल्याची माहिती श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी साहेब यांनी दुरध्वनीवरून दिली आहे.
 
sakhara logo_1  
 
सध्या सर्व जगाबरोबरच भारतामध्ये सुद्धा कोरोना या महाभयंकर अशा व्हायरसने थैमान घातले असून यामध्ये सर्वत्र हॅन्ड सॅनिटायझर ची मागणी वाढली असून यामुळे आम्ही सॅनीटायझर निर्मितीची ची परवानगी घेऊन हे कामकाज सुरु करणार आहोत. यामध्ये कारखाना हा आठ ते दहा लाख लिटर सॅनीटायझर बनवू शकतो. आता सध्यस्थितीला एक लाख लिटरची आमच्याकडे मागणी असून यापुढे ज्याप्रमाणे मागणी वाढेल त्याप्रमाणे सॅनियझर निर्मिती करण्यात येईल! देशातील व राज्यातील साखर कारखान्याच्या डिस्टिलरीना स्पिरिटमधून हॅड सॅनिटायझर निर्मिती करण्याचे आव्हान केले. त्यानुसार महाराष्ट्रात ४३ साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यात समतोल राहणार आहे त्यानुसार पांडुरंग कारखान्यांनी रीतसर परवानगी घेऊन सॅनिटायझर उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.
 
कारखान्यांनी चालू हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यामध्ये ५८ लाख स्पिरिटचे उत्पादन केले आहे. त्यामधील १८ लाख लिटर इथेनॉल निर्मिती करून जवळपास आठ ते नऊ लाख लिटर स्पिरीट शिल्लक आहे. देशामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे साखर व इथेनॉलचा उठाव कमी झाला असून कारखानदारी अधिकच अडचणीत सापडली आहे. सॅनिटायझर निर्मितीमुळे कारखान्याला आर्थिक घडी बसविण्यास मदत होणार आहे आणि कारखानदारी थोडेफार अच्छे दिन येऊ शकतात.तसेच पुढील वर्षी कारखान्याला मुबलक प्रमाणात ऊस असल्यामुळे आम्ही सॅनीटायझर बरोबरच अजून अनेक उपपदार्थाच्या निर्मितीवर भर देणार आहोत अशी महिती कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.यशवंतराव कुलकर्णी यांनी दिली आहे.
 
Yashwantrao_1  
 
आमच्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे आत्तापर्यंत एक लाख लिटरची सॅनियझर मागणी असून आम्ही हॅप किंग इन्स्टिट्यूट च्याबरोबर करार करणार असून त्यांच्या निविदा (टेंडर) निघणार आहेत आम्ही आठ लाख लिटर पर्यंत सॅनियझर बनवू शकतो तसेच ज्याप्रमाणे मागणी येईल त्याप्रमाणे आम्ही सॅनिटायझर बनवुन सुंपत हॅ सॅनियझर या नावाने बनवून बाटली तयार करणार आहोत. यासाठी आम्हास सर्व प्रकारची परवानगी मिळाली असून दोन ते तीन दिवसांमध्ये याचे उत्पादन आम्ही सुरू करणार आहोत!
- श्री डॉ. यशवंतराव कुलकर्णी कार्यकारी संचालक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर