कर्जधारकांसाठी ४ बँकांचा मोठा दिलासा

जनदूत टिम    01-Apr-2020
Total Views |
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅनरा बॅंक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बॅंक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध प्रकारचे ईएमआय भरण्याचे दिवस सुरु होतात. २७ मार्चला रिझर्व बॅंकेनं तीन महिने कर्जाचे हप्ते देण्याची सक्ती करु नका असे निर्देश दिले होते. परंतु अंतिम निर्णय बॅंकावर सोडला होता.
bank_1  H x W:
 
 
आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी चा बॅंकानी ज्यात कॅनरा बॅंक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बॅंक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे.त्यांनी पुढच्या तीन महिन्यासाठी हप्ते न देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढे तीन महिने वाढवला जाईल असं देखील नमूद केलं आहे. ही मुभा १ मार्च ते ३१ मे या कालावधीसाठी असणार आहे. या मध्ये सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. कृषी, गृह, वाहन, लघु आणि मध्यम उद्योग, वैयक्तिक कर्ज, कॉर्पोरेट तसंच कॅश क्रेडीट फॅसिलिटीवरची रिकव्हरी पण तीन महिन्यासाठी थांबवली आहे. या निर्णयाबरोबरच रेपोरेट कमी केल्यानं कर्जावरचा इंटरेस्ट रेट कमी करुन त्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णयही काही बॅंकानी घेतला आहे.