डिप्रेशनमधून सुटका हवीय? तर मग करा ह्या गोष्टी

जनदूत टिम    01-Apr-2020
Total Views |
कधी, कोणाला, कोणत्या गोष्टीमुळे डिप्रेशन येईल, हे सांगता येणे कठीण आहे. पण योग्य आहार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे या आजारावर तुम्ही नक्कीच मात करू शकता. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीनं कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत? यावर आपण आज चर्चा करणार आहोत. डिप्रेशन येण्यामागील कारणे आणि लक्षणे (Depression Symptoms) लक्षात घेऊन आपण आहारामध्ये अशा काही विशेष गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून संबंधित व्यक्तीला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होईल. नैराश्यातून मात करण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
 
depression_1  H
 
​दही
दह्यामध्ये (Curd) लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरिया नावाच्या निरोगी जिवाणूंचा (Healthy bacteria) समावेश असतो. लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियामुळे मेंदूवर सकारात्मक प्रभाव होतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. नियमित दह्याचं सेवन केल्यास चिंता, ताणतणाव, नैराश्याच्या समस्यांपासून आपली सुटका होण्यास मदत होते. शिवाय, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) वाढण्यास उपयुक्त घटकही दह्यामध्ये आहेत. शरीराला नुकसान पोहोचवू पाहणाऱ्या जिवाणूंना नष्ट करण्याची क्षमता दह्यामध्ये आहे.
 
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये (Green Tea) थायमिन नावाचं अमिनो अ‍ॅसिड असते. मूडसंबंधित विकार दूर करण्याची क्षमता अमिनो अ‍ॅसिडमध्ये असते. यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारण्यास मदत होते. थायमिनमध्ये मेंदूला आराम मिळवून देणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे डिप्रेशनमधून (Depression) बाहेर पडण्यासाठी तुम्ही दैनंदिन जीवनात नेहमीच्या चहाऐवजी ‘ग्रीन टी’चा समावेश करावा. शिवाय, शरीरातील विषारीद्रव्ये देखील बाहेर फेकण्यास मदत मिळते.
 
कॅमोमाइल चहा
काळा चहा किंवा दुधाचा चहा पिण्याऐवजी कॅमोमाइलचा चहा प्यायल्यास आरोग्यास अधिक फायदे मिळतील. या चहामुळे शरीराला सूज येत नाही, रोगजंतूंविरोधात लढण्याची क्षमता मिळते, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि शरीराला आराम मिळतो. कॅमोमाइलमध्ये असणाऱ्या फ्लेव्होनॉइड्स गुणधर्मामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. या चहामुळे तुम्हाला निद्रानाश, झोपेसंबंधीच्या सर्व आजारांतून सुटका मिळते. महत्त्वाचे म्हणजे नैराश्याची चिन्हे कमी करण्यास आपल्याला मदत मिळते. झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहाचं सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप मिळेल.
 
​अ‍ॅव्होकाडो
सेरोटोनिन हार्मोन्स आपला मूड चांगला ठेवण्याचं कार्य करत असतात. तुम्ही आहारामध्ये अ‍ॅव्होकाडो फळाचा समावेश केल्यास सेरोटोनिन हार्मोन्सची पातळी वाढण्यास मदत होते. अ‍ॅव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन बी व्यतिरिक्त थायमिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन नावाचे आरोग्यासाठी फायदेशीर घटक मुबलक प्रमाणात आहेत. या घटकांमुळे मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे काही जण चिंताग्रस्त असतात. अ‍ॅव्होकाडोमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे, हे खनिज आपल्या मेंदूसाठी अतिशय आवश्यक असते. हे वेळोवेळी न्युरोट्रान्समीटर सोडण्याचे काम करते. ज्यामुळे भूक, तहान, झोप यावर योग्य नियंत्रण राहते आणि चिंता-नैराश्यही कमी होण्यास मदत मिळते.
 
​भोपळ्याची बी
पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत म्हणून 'भोपळ्याच्या बी'कडे पाहिलं जातं. शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राखण्याचं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे कार्य पोटॅशियम करतं. भोपळ्याच्या बीमध्ये ताणतणाव आणि चिंता कमी करण्याची क्षमता आहे. नैराश्याची कारणे आणि लक्षणे आढळून आल्यास आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. या बियांमध्ये असलेला झिंक नावाचा घटक आपला मूड चांगला ठेवण्याचं काम करते. ज्यांचं मानसिक आरोग्य निरोगी आहे, ते देखील आपल्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकतात.
 
​मासे
तुम्हाला मासांहार करायला आवडत असेल तर उपाय म्हणून तुम्ही माशांचा समावेश करू शकता. डिप्रेशनमुक्त होण्यासाठी सॅल्मन, मॅकेरेल, सार्डिन आणि टुना हे मासे तुम्ही खाल्ले पाहिजेत. या माशांच्या सेवनामुळे तुम्हाला नैराश्याविरोधात लढण्यासाठी मदत मिळते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅट्सचा समावेश असतो. हा घटक मेंदूच्या पेशींमध्ये संपर्क साधण्यास मदत करतो. आहारात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास सेरोटोनिन हार्मोन्सची पातळ वाढण्यास मदत होते. ज्यामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते.
 
सुका मेवा
काजू, अक्रोड, ब्राझील नट आणि हेझल नटमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते. तुलनेनं अक्रोडमध्ये या घटकाचा अधिक प्रमाणात समावेश असतो. मेंदूचं आरोग्य निरोगी राखण्याचं काम अक्रोड करते. यामध्ये प्रोटीनचंही प्रमाण जास्त असतं. प्रोटीनमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत समतोल राखला जातो. अक्रोडमध्ये फोलेटचे प्रमाणही भरपूर आहे, ज्यामुळे अशक्तपणा आणि नैराश्य कमी होण्यास मदत मिळते. एकूणच अक्रोडच्या सेवनामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते.
अंड
अंड्यातील पिवळ्या बलक हे 'व्हिटॅमिन डी' तसंच 'प्रोटीन'चा उत्तम स्त्रोत आहे. अंड्याच्या सेवनामुळे शरीराला सर्व प्रकारचे आवश्यक असणारे अमिनो अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. अंड्यामध्ये ट्रिप्टोफेन नावाचं अमिनो अ‍ॅसिड आहे, जे सेरोटोनिन हार्मोन वाढवण्यास मदत करते. सेरोटोनिन हे केमिकल न्यूरोट्रान्समीटर (रासायनिक संदेशवाहक) आहे, जे मूड, झोप, स्मृती आणि आपले वर्तन नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. सेरोटोनिन हार्मोन्स हे मेंदूचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आणि मेंदूला चिंतामुक्त ठेवण्याचंही कार्य करता, असेही म्हटलं जातं.
 
हळद
हळदीमध्ये कर्क्यििमन (Curcumin) नावाचं रसायन असतं. हा घटक शरीरातील सूज आणि ताणतणाव कमी करण्याचं काम करतो. मूडसंबंधित सर्वच विकारांमध्ये सूज आणि तणावाची लक्षणं आढळून येतात. ही समस्या कमी करण्यासाठी आहारात हळदीचा वापर करावा. यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मेंदूतील नैराश्याला प्रवृत्त करणाऱ्या घटकांना कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्याचं काम हळद करते. हळदीच्या दुधाचे सेवन तुमच्या शारीरिक आरोग्यासह तसंच मानसिक आरोग्यासही उपयुक्त आहे.