आधुनिक युगात मातीच्या माठाची लोकप्रियता आजही कायम!

जनदूत टिम    07-Mar-2020
Total Views |
बोरघर / माणगांव : प्राचीन काळातील समाज व्यवस्थेत सर्वत्र बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. या बारा बलुतेदारांपैकी कुंभार हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक होता. त्या काळात कुंभार समाज मातीपासून सर्व प्रकारची भांडी तयार करून तत्कालीन समाज व्यवस्थेला आपल्या कुंभारी व्यवसायातून हातभार लावत होता.
 
CLAY SOIL_1  H
 
पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने आपल्या बौद्धिक कौशल्याने सर्व क्षेत्रात कमालीची प्रगती केली. आणि यांत्रिक युगाचा जन्म झाला. वेगवेगळ्या यांत्रिक सामुग्रीच्या माध्यमातून माणूस आपल्या जीवनावश्यक वस्तू बनवू लागला. यंत्राच्या सहाय्याने घरातील सर्व प्रकारची तांबा पितळेची आणि स्टीलची आकर्षक भांडी आणि थंड पाण्यासाठी फ्रीज रिफ्रेजेटर अर्थात शीतयंत्र निर्माण करण्यात आली त्यामुळे पारंपरिक मातीच्या भांड्यांचा खप कमी झाला. लोक आपल्या दैनंदिन जीवनात सर्रास तांबा पितळेची आणि स्टीलची आकर्षक भांडी वापरू लागले. आणि पिण्याचे पाणी साठवण करून ठेवण्यासाठी विविध धातू पासून बनवलेली हंडा, कळशी आणि टाक्या पिंप इत्यादींचा वापर करू लागले. आणि त्यामुळे कुंभाराने बनवलेल्या मातीच्या भांड्यांचा खप कमी झाला. त्यामुळे कुंभार समाजावर आर्थिक उपासमारीची वेळ आली.
 
परंतू फ्रीज मधील गार पाणी प्यायल्याने माणसाच्या तब्येतीवर परिणाम होवू लागला. माणसाच्या आकाराचे कारण फ्रीज मधील थंड पाणी हे कारणीभूत ठरले. त्यामुळे डाॅक्टरांनी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यास मनाई केली.
त्यामुळे पुन्हा एकदा सर्व माणसांचा कल मातीपासून बनवलेल्या माठ, मटके, घागर आणि रांजण इत्यादी वस्तूकडे वळला. आणि पुन्हा एकदा थंड पाण्यासाठी पर्याय म्हणून मातीपासून बनवलेल्या माठ, मटके, घागरी आणि रांजण यांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे फ्रीज आणि रिफ्रेजेटर च्या आधुनिक काळात मातीच्या माठाची लोकप्रियता आजही कायम आहे.