दैनिक जनदूत न्यूज पोर्टलचा लोकार्पण सोहळा संपन्न

जनदूत टिम    07-Mar-2020
Total Views |
ठाणे:- दैनिक जनतेचा जनदूत या वृत्तपत्राच्या डिजिटल स्वरूपात, न्यूज पोर्टल चे www.jandut.in उदघाटन शेवंती नाना निचिते यांच्या हस्ते जागतिक महिला दिन निमित्ताने पार पडले यावेळी संपादिका मंजुळा किरण निचिते यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.

Inauguration_1  
 

jandut04_1  H x 
दि ७ मार्च २०२०, सायं ७.०० वा. महिला दिनाचा मुहूर्तावर झालेल्या या छोटेखानी न्यूज पोर्टल च्या अनावरण सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शांताई च्या संचालिका वनिता निचिते, छायाताई जगताप, सविता बनकरी, दूर्वांकुर च्या संचालिका भावनाताई भोईर, श्वेता दामोदरे, सुजाता भोईर, सौ नमिता नितीन पाटील चित्रा नितीन जाधव आदी उपस्थित होत्या.

jandut03_1  H x
 
या निमित्ताने बाल कलाकार प्रणवी विनायक पवार हिने देशभक्ती पर आपले विचार उपस्थित महिला भगिनींना जोशपूर्ण वातावरणात ऐकवून सर्वांच्या रोमा रोमात उत्साह संचारला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जगताप यांनी केले.