शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेस मान्यता - गुलाबराव पाटील

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेस मान्यता - गुलाबराव पाटील

जनदूत टिम
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ९७ गावांसाठी इगतपुरी येथील भावली धरणाच्या पाण्यावर आधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Gulabrao patil_1 &nb 
सदस्य शांताराम मोरे व मा. आ. पांडूरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाटील बोलत होते. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१६-१७ मध्ये भावली धरणाच्या पाण्यावर आधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली. मात्र, दरडोई खर्च निकषापेक्षा जास्त असल्याने या योजनेस उच्चाधिकार समितीची मंजूरी मिळणे आवश्यक होते. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या बैठकीत या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.