नागोठणे ग्रामपंचायत स्त्यावर बसणारे मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे !

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

नागोठणे ग्रामपंचायत स्त्यावर बसणारे मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे !

जनदूत टिम
नागोठणे : सविस्तर असे की नागोठणे ग्रामपंचायत कडे दिनांक २१/०१/२०२० रोजी नागोठणे ग्रामस्थ यांनी लेखी तक्रारी अर्ज रस्त्यावर बसून मच्छी विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेते यांच्या विरुद्ध केली होती. लोकांचा रहदारीचा असलेला मुख्य रस्ता त्या रस्त्यावर नागोठणे कोळीवाड्यातील मच्छी विक्रेते ग्रामपंचायतीचे अधिनियम तसेच रस्ता सुरक्षा अधिनियमचा उल्लंघन बिनधास्तपणे करून कायद्याची कोणतीही भीती न बाळगता तसेच ग्रामपंचायत व नागोठणे पोलीस स्टेशन च्या कारवाईला न घाबरता लोकांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जाची पर्वा न करता बिनधास्तपणे आजही लोकांचा मुख्य रहदारीचा असलेला रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत आहेत.
 
fish in road_1  
 
तसेच रस्त्यावर मच्छीचे घाण पाणी साचत असल्याने व त्या घाण पाणीच्या दुर्गंधी मुळे लोकांना त्रास होत असून त्याच रस्त्यावरून लोक जात असताना लोकांना नाक मोठीत दाबून जावे लागत आहे रस्त्यावर मच्छी विक्रेते हे प्लास्टिक मेणकापडाचे स्वतःच्या डोक्यावर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छोटे-छोटे झोपडी सारखी व्यवस्था करून लोकांचा मुख्य रहदारीचा असलेला रस्ता अडवणूक करून बसत आहेत त्याच रस्त्यावरून चारचाकी वाहण कींवा रिक्षा ऑटो टू व्हीलर वाहनांना प्रवास करीत अडथळा निर्माण होत आहे यापूर्वी नागोठणे ग्रामपंचायतीने शासनाचे लाखो रुपये खर्च करून चांगली भली मोठी इमारत मच्छी मार्केट सिमेंटचे बांधकाम करून व सिमेंट पत्र्याचा छपर टाकून दिले असताना देखील हे मच्छी विक्रेते जाणीवपूर्वक रस्त्यावर बसूनच मच्छी विक्री करत आहेत या सर्व गंभीर परिस्थिती संदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थ यांनी स्वतःच्या सह्यांचा लेखी तक्रारी अर्ज दिला आहे तसेच नुकतेच झालेले ग्रामसभेमध्ये त्यासंदर्भात ठराव घेण्यात आला आहे तरी ग्रामपंचायत या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत असलेल्या मच्छी विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांन कडून केला जात आहे ग्रामपंचायतीचे अधिनियम मोडीत व बेकायदेशीर त्या रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत असलेले विक्रेत्यांवर ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही ग्रामस्थांनी लेखी तक्रारी अर्ज दिलेला एक महिना होऊन गेला देखील अध्यायपर्यंत नागोठणे ग्रामपंचायत कोणतीच कायदेशीर कारवाई करत नाही या पाठी मागचे मुख्य कारण काय आहे असेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे व पंचायतीवर प्रश्न निर्माण होत आहे.
 
ग्रामस्थांच्या लेखी तक्रारी अर्जाला नागोठणे ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवित आहे नागोठणे ग्रामपंचायत लोकांचा रस्ता सुरक्षितेचा प्रश्न मार्गी का लावत नाही हा मोठा प्रश्न आहे असे ग्रामस्थ यांच्याकडून बोलले जात आहे नागोठणे ग्रामस्थांनी लेखी तक्रारी अर्ज नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात रोहा पंचायत समिती आरोग्य विभाग कार्यालय नागोठणे पोलिस स्टेशन कार्यालय रोहा तहसीलदार कार्यालय रोहा उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय अशा सर्व वरिष्ठ कार्यालयाकडे अर्ज दिला असून तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा कोणतीही बेकायदेशीर व बेशिस्त पणे सर्व नियमांचे उल्लंघन करत रस्त्यांवर बसून मच्छी विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर रस्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही गावात भांडण-तंटे ज्यावेळी दोन समाजामध्ये होऊन अनुचित प्रकार घडून गावात अशांतता पसरल्यानंतर नागोठणे ग्रामपंचायती कडून तसेच वरिष्ठ कार्यालय करून पुढील कारवाई केली जाणार आहे काय ? असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे ग्रामस्थ यांनी लेखी तक्रारी अर्ज देण्यापूर्वी नागोठणे कोळीवाडा येथे एक तरुणाबरोबर घडलेला अनुचित प्रकार संदर्भात भांडण-तंटा होऊन एकमेकाविरुद्ध चाप्टर केस नागोठणे पोलीस स्टेशन येथे नोंद झाल्याचे निदर्शनास आणून दिले असताना देखील सुद्धा नागोठणे ग्रामपंचायतीला जाग येत नाही नागोठणे ग्रामपंचायत कसली वाट पाहत आहे असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे प्रथमच जनतेतून थेट सरपंच पदी निवडून आलेले डॉक्टर मिलिंद धात्रक साहेब आता तरी या ठिकाणी लक्ष केंद्रित करतील काय ? रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत असलेले मच्छी विक्रेते यांना मच्छी मार्केट इमारत मध्ये कायम स्वरूपी बसण्याची धाडस करतील काय ? तसेच तमाम नागोठणे ग्रामस्थ यांना न्याय देतील काय ? असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.