कल्याणात कोरोना प्रतिबंधासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा पुढाकार

जनदूत टिम    30-Mar-2020
Total Views |
कल्याण : कोरोना प्रतिबंधासाठी कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका व आरोग्य प्रशासन करत असलेल्या कामाला मदत करतच भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्याण पश्चिम क्षेत्रात विविध ठिकाणी कोरोनामुक्तीसाठी काम करताना दिसत आहेत.
 
Narendra Pawar_1 &nb
 
शहरातील पारनाका, सिद्धेश्वर आळी, अहिल्याबाई चौक, शहाड, बल्याणी व इतर परिसरात सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी रिक्षाचालकांना भाजपा रिक्षा युनियनच्या माध्यमातून मोफत शिधा वाटप केला. यासोबतच बल्याणी येथे मोफत आरोग्य तपासणी व गरजूंना शिधा वाटप केला.
वडवली नागरिकांना व्यक्तिगत भेटून भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याबरोबरच टेम्परेचर चेकअपसुद्धा केले. आदी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची मदत करत असतानाच टिटवाळा येथे गरजू कामगारांना भोजन दिले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध व्यक्तींना मास्कचेही वाटप केले आहे. व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधत नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार प्रयत्नशील आहेत. युवक व स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या कोणत्याही अडचणी तातडीने सोडवल्या जातात. आपल्याला कोरोना विषाणू परतवून लावायचा आहे, केवळ काही दिवस आपण दिलेल्या सूचना शांततेत पाळल्या व प्रशासनाला सहकार्य केले तर निश्चितपणे यशस्वी होऊ. कोणत्याही अडचणी असतील तर माझ्यापर्यंत पोहचवा, मी आपल्या सोबत हे असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे.
 
यावेळी पारनाका परिसरात महेश केळकर, महेश चौधरी, एस.एम.जोशी, श्री देवस्थळी, खैरणार, रवी पवार यांनी मदत केली. वडवली, बल्याणी परिसरात सुभाष पाटील, बुधा सरनोबत, जक्की पाकुर्डे, मुन्ना रईस, संतोष शिंगोळे, विजय पाटील हनुमान तरे, राजेश यादव, संदीप पाटील, नागेश पाटील, आर. के. सिंग, मोहन कोनकर, रमेश कोनकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध उपक्रमात
सहकार्य केले.