पालघर जिल्ह्यात ६२५ जण देखरेखीखाली

जनदूत टिम    30-Mar-2020
Total Views |
पालघर : पालघर जिल्ह्यातील परदेश प्रवास करून आलेल्या ६२५ जणांना प्रशासनाने देखरेखीखाली ठेवले असून यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील ३३० जणांचा समावेश आहे. यापैकी २ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

corona002213_1   
 
पालघर जिल्हा माहिती कार्यालयातून शनिवारी (दि. २८ मार्च) ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या ६२५ जणांपैकी २३२ जणांना देखरेखीखाली ठेवून १४ दिवस पूर्ण झाले आहेत.
आत्तापर्यंत यापैकी कोरोनाची लक्षणे आढळलेल्या ३७ जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी २ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ते दोघेही रुग्ण वसई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. तर २३ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून अजून १२ रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
दरम्यान देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णापैकी २५ जण हे ६० वर्षावरील असून अन्य आजाराचा पूर्व इतिहास असणारे आहेत. पालघर जिल्ह्यातील देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
वसई-विरार महानगरपालिका - ३३०
वसई ग्रामीण - १२९
● पालघर तालुका - ९९
● डहाणू तालुका - ३६
● वाडा तालुका - २१
● तलासरी तालुका - ६
● विक्रमगड तालुका - ३
● जव्हार तालुका - १
● मोखाडा तालुका - एकही नाही