नदी नाल्यातून हजारो टन गाळ साफ करत आहेत मठाधिपती फुलनाथजी बाबा

जनदूत टिम    03-Mar-2020
Total Views |

नदी नाल्यातून हजारो टन गाळ साफ करत आहेत मठाधिपती फुलनाथजी बाबा

जनदूत टिम
शहापूर : जे काम प्रशासनाने करणे गरजेचे होते ते काम आज मठाधिपती फुलनाथजी बाबा करत आहेत हजारो टन गाळ नदी नाल्यातून बाहेर काढून नाले साफ करण्याचे काम ते करत आहेत. काय गरज आहे त्या एका संन्याशी माणसाला हे सर्व करण्याची त्यांना निवडणूक लढवायची आहे की त्यांना सरपंच, आमदार , खासदार व्हायचे आहे? गेल्या तीन महिन्या पासून स्वतःचा वेळ देऊन त्यांनी जे कार्य हाती घेतले आहे ते खूप महान कार्ये आहे भविष्यात त्या परिसरातील जनतेला याचा खूप फायदा जाणार आहे.
 
nala 1_1  H x W
 
अडीच - तीन किमी पर्यंत लांब आणि दोन अडीच मीटर पर्यंत खोल असलेल्या नदीतील गाळ उपसून बाहेर काढून पूर्ण गाळात भरलेल्या नद्या नाले साफ करणे म्हणजे साधे काम नाही. आणि हे काम जर शासना मार्फत केले असते तर करोडो रुपयाचे टेंडर पास करून तेथे अनेक ठेकेदारांनी सरकारी निधी हडप केला असता. एक संन्याशी माणूस लोक हितासाठी काम करत आहे, भाविक त्यांचे दर्शन घेतात आणि त्यांच्या हातात १०-२०-५०- १०० रुपये देतअसतात ती पुंजी जमा करून त्यांनी हे महान कार्ये करायला घेतले आहे. मी काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती बघितली तर ४JCB, ४ ट्रॅकटर आणि १५ ते २० माणस म्हणजे रोजचा खर्च हा कमीत कमी ३० ते ३५ हजार पेक्षा जास्ती असू शेकतो पण कमी नाही आणि ते ही अडीच ते तीन महिन्या पासून एकही दिवस खंड न पडता रोजच काम चालू आहे. अशा महान कार्यात आता पर्यंत एकही लोक प्रतिनिधींनी जाऊन ढुंकून सुद्धा बघितले नाही. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.
 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य देखील त्याच भागातील आहेत, कोणत्या ही लोकप्रतिनिधींनी किंवा एकही कार्येकर्त्यांनी ढुंकून ही बघितले नाही. *आपल्या वाढदिवसा निमित्त बॅनर बाजी आणि चमकू गिरी वर हजारो रुपये खर्च करतात, तर त्या दिवशी दारू आणि मटनावर ही हजारो रुपये उधळतात त्या पेक्षा एका संन्यासाने हाती घेतलेले कार्ये हे महान आहे, तेथे जाऊन त्यांना मदत करा. जे काम शासनाला करोडो रुपये खर्च करून करावे लागले असते ते काम एक सन्यासी माणूस आपल्या स्व खर्चाने करत आहे, सलाम या विभूतीला.