दिल्ली हिंसाचार शाहरुखला अटक

जनदूत टिम    03-Mar-2020
Total Views |

दिल्ली हिंसाचार शाहरुखला अटक

दिल्ली : दिल्लीत ‘सीएए’ वरून उफळलेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखणारा तो लाल टी शर्टमधील तरूण अखेर पोलिसांनी पकडला आहे. शाहरुख असं त्याचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशमधील शामली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. मध्यंतरी त्या तरुणास ताब्यात घेतल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, मात्र नंतर दिल्ली पोलिसांकडून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले होते. दिल्ली पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. शिवाय, त्याला आश्रय देणाऱ्यांचा देखील तपास सुरू आहे.
 
shahrukh_1  H x
 
दिल्लीतील हिंसाचारादरम्यान २४ फेब्रवारी रोजी एका तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखल्याचा फोटो माध्यमांवर आला होता. शिवाय, त्याने हिंसचार घडत असलेल्या ठिकाणी आठ गोळ्या देखील झाडल्या होत्या. मात्र नंतर तो गर्दीचा फायदा घेत फरार झाला होता. अनेक दिवसांपासून दिल्ली गुन्हे शाखेचे पोलीस शाहरुखचा कसून शोध घेत होते. अखेर तो उत्तर प्रदेशमधील शामली येथे दडून बसल्याची माहिती मिळाताच, दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने त्याच्या मुसक्या आवळल्या.